TRENDING:

Alcohol Fact : लोक दारू कमी का पितायत? कारण ऐकाल तर आश्चर्य वाटेल…; नशेच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल

Last Updated:
आरोग्याबद्दल वाढती जागरूकता, आर्थिक ताण, कठोर नियम आणि सोशल हॅबिट्समधील बदलामुळे अनेकजण दारूचे सेवन कमी करत आहेत. एवढच नाही तर दारुची किंमत वाढल्यामुळे अनेक लोक दारुपासून दूर जाऊ लागले आहेत किंवा काहींनी त्याचं सेवन करणं कमी केलं आहे.
advertisement
1/9
लोक दारू कमी का पितायत? कारण ऐकाल तर आश्चर्य वाटेल…नशेच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल
आजच्या जलद बदलणाऱ्या जीवनशैलीत लोकांचे पिण्याचे पॅटर्नही बदलत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत पार्ट्या असोत, सण असोत किंवा वीकेंड दारू हा अनेकांचा पहिला पर्याय होता. पण गेल्या काही वर्षांत भारतात एक वेगळीच ट्रेंड दिसू लागली आहे.
advertisement
2/9
आरोग्याबद्दल वाढती जागरूकता, आर्थिक ताण, कठोर नियम आणि सोशल हॅबिट्समधील बदलामुळे अनेकजण दारूचे सेवन कमी करत आहेत. एवढच नाही तर दारुची किंमत वाढल्यामुळे अनेक लोक दारुपासून दूर जाऊ लागले आहेत किंवा काहींनी त्याचं सेवन करणं कमी केलं आहे.
advertisement
3/9
याच पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि काही इतर राज्यांतून आलेल्या ताज्या रिपोर्ट्सनं एक मोठा प्रश्न उभा केला आहे "खरोखरच लोक दारूपासून दूर जात आहेत का? आणि या उलट गांजाचे सेवन वाढत आहे का?"
advertisement
4/9
कर्नाटकातील काही महिन्यांचे आकडे म्हणतात की दारूची विक्री सलग कमी होत आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये एप्रिल–ऑक्टोबर दरम्यान 407 लाख केसवरून विक्री 403 लाख केस झाली. कर्नाटक लिकर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष लोकेश म्हणाले की "ड्यूटी दरवर्षी वाढते. ग्राहक महागाईमुळे दारू घेऊ शकत नाहीत." ते पुढे हे देखील म्हणाले की, "बीअरवरही टॅक्स वाढला आहे. तर लोक आता गांजा, चरसकडे वळत आहेत."
advertisement
5/9
केरळमध्ये 10 वर्षांत दारू विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली.2011–12 मध्ये 241.78 लाख केस विक्री होती, जी 2024–25 मध्ये 228.6 लाख केसवर आली.
advertisement
6/9
भारताच्या एकूण आकड्यानुसार देशातील 22.4% लोक दारू पितात, पण 2015–16 मध्ये हा आकडा 29.2% होता. म्हणजेच मागील काही वर्षांत देशभरात दारू पिणाऱ्यांची संख्या घसरली आहे.
advertisement
7/9
दुसऱ्या बाजूला गांजाचे सेवन वाढतेय का?ब्राउन युनिव्हर्सिटीच्या एका नवीन अभ्यासानुसार, गांजाचा वापर वाढल्याने दारू पिण्याकडे लोकांचा कल कमी होऊ शकतो. अ‍ॅमेरिकन जर्नल ऑफ सायकिअॅट्रीमध्ये छापलेल्या अभ्यासानुसार गांजा सेवन केल्यानंतर काही तास दारूची इच्छा कमी होते.
advertisement
8/9
लोक कमी प्रमाणात दारू पितात, प्रयोगात लोकांनी नॉर्मलच्या तुलनेत 27% कमी दारू घेतली. हा अभ्यास 21–44 वयोगटातील 157 लोकांवर करण्यात आला, ज्यांचं दोन्ही पदार्थांवर समान अवलंबित्व होतं.
advertisement
9/9
दारू विक्री कमी होण्याची इतर कारणेही आहेतकाही राज्यांमध्ये ड्राय स्टेट पॉलिसी,हायवेवरील दारू दुकाने बंदटॅक्स वाढमहागाईआरोग्याबद्दल जागरूकता इत्यादी
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Alcohol Fact : लोक दारू कमी का पितायत? कारण ऐकाल तर आश्चर्य वाटेल…; नशेच्या ट्रेंडमध्ये मोठा बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल