Sairat : 'सैराट'मध्ये फक्त रिंकूच नाही, तिचे आई-वडीलही झळकले होते; आठवतोय का तो सीन!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru Parents in Sairat : सैराट सिनेमा तुमच्यातील अनेकांनी अनेकदा पाहिला असेल पण तुम्हाला माहितीये का रिंकूचे आई-वडीलही या सिनेमात होते. आठवतोय का तो सीन?
advertisement
1/6

अभिनेत्री रिंकू राजगुरुला 'सैराट' या सिनेमामुळे ओळख मिळाली. सैराट या सिनेमानं रिंकूला फेम मिळवून दिलं. 'सैराटची आर्ची' अशी रिंकूची ओळख निर्माण झाली आहे.
advertisement
2/6
2016 साली आलेल्या 'सैराट' या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीत इतिहास घडवला. 100 कोटीहून अधिक कमाई करणारा सैराट हा पहिला मराठी सिनेमा आहे. मागील 10 वर्षात या सिनेमाचा रेकॉर्ड कोणताच मराठी सिनेमा तोडू शकला नाही.
advertisement
3/6
'सैराट' सिनेमात नागराज मंजुळे यांचे काही नातेवाईकही दिसले होते. त्यांच्या प्रत्येक सिनेमात ते कोणाला ना कोणाला एखाद्या फ्रेममध्ये झळकण्याची संधी देतात.
advertisement
4/6
तुम्हाला माहिती आहे का 'सैराट' सिनेमात फक्त रिंकू नव्हती तर तिचे आई बाबाही होते. एका सीनमध्ये त्यांची एन्ट्री दाखवण्यात आली होती.
advertisement
5/6
मध्यंतराआधी आर्ची आणि परशाला पोलीस स्टेशनमध्ये नेतात. आर्चीचे वडील परशाविरोधात विनभंगाची खोटी केस दाखल करतात. हे आर्चीला कळतं तेव्हा ती रागाने पोलीस स्टेशनला पोहोचते.
advertisement
6/6
रिंकू पोलीस स्टेशनच्या आत जात असतानाच्या त्या सीनमध्ये बाहेर एका फ्रेममध्ये तिचे आई-वडील उभे असल्याचं दिसतं. रिंकूच्या आई-वडिलांची एवढी एकच झलक सिनेमात दिसते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sairat : 'सैराट'मध्ये फक्त रिंकूच नाही, तिचे आई-वडीलही झळकले होते; आठवतोय का तो सीन!