TRENDING:

पिवळी पैठणी, डोक्यावर पदर, 'आशा'च्या सेटवर रिंकू राजगुरूने पहिल्यांदा केली ही गोष्ट; खान्देशशी खास कनेक्शन

Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूनं तिचे पैठणी साडीतील फोटो शेअर केलेत. हे फोटो 'आशा' सिनेमाच्या सेटवरचे आहेत. हे फोटो म्हणजे सिनेमाच्या सेटवर रिंकूनं केलेल्या एका खास गोष्टीची आठवण आहे.
advertisement
1/9
'आशा'च्या सेटवर रिंकू राजगुरूने पहिल्यांदा केली ही गोष्ट; खान्देशशी खास कनेक्शन
मराठी सिनेमा </a>येत्या 19 डिसेंबरला रिलीज होतोय. या सिनेमात ती आशा सेविकेच्या भूमिकेत आहे. आशा सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांआधीच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद दिला. " width="1200" height="900" /> अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आशा हा मराठी सिनेमा येत्या 19 डिसेंबरला रिलीज होतोय. या सिनेमात ती आशा सेविकेच्या भूमिकेत आहे. आशा सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांआधीच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगला प्रतिसाद दिला.
advertisement
2/9
रिंकू राजगुरू सैराट सिनेमानंतर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सैराटची आर्ची ते आता आशामधील मालती असा रिंकूचा करिअर ग्राफ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/9
आशा हा सिनेमा रिंकूसाठी सगळ्याच अर्थानं महत्त्वाचा आहे. आशा सिनेमासाठी रिंकूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हा सिनेमा अनेक फेस्टिव्हलमध्ये देखील दाखवण्यात आला आहे.
advertisement
4/9
आशा सिनेमाच्या निमित्तानं रिंकू राजगुरूने अनेक नव्या गोष्टी एक्सप्लोर केल्यात. सैराटमध्ये बुलेटवर फिरणारी रिंकू आशामध्ये सायकलवरून फिरताना दिसणार आहे आणि ते देखील साडी नेसून.
advertisement
5/9
इतकंच काय तर रिंकू चालत्या ट्रकमध्येही चढताना दिसणार आहे. आशाच्या सेटवर रिंकूने आणखी एक खास गोष्ट केली. ज्याचं खान्देशशी खास कनेक्शन आहे. रिंकूने स्वत: याबद्दल खूप आनंद व्यक्त केला.
advertisement
6/9
रिंकूने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केलेत. हे फोटो आशा सिनेमाच्या सेटवरचे आहेत. रिंकूनं पिवळ्या रंगाची पैठणी नेसली आहे. डोक्यावर पदर घेतला. गळ्यात मंगळसूत्र आहे. हातात पुरणपोळ्यांचा नैवेद्य आहे.
advertisement
7/9
"मालती & निलेश –आशा. 'आशा' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच खान्देशातील आई कानबाई या मंगलमय उत्सवाचा अनुभव घेता आला", असं म्हणत रिंकूनं हे फोटो शेअर केलेत.
advertisement
8/9
एका मुलाखतीत बोलताना रिंकूनं सांगितलं, "कानबाई मी पहिल्यांदा पाहिलं, मी पहिल्यांदा देवासमोर नाचले. मी कधीच असं केलं नव्हतं. मला ती प्रोसेसच माहिती नव्हती." कानबाईमध्ये टोपली डोक्यावर घेऊन नाचलं जातं जे रिंकू आणि सायंकितला माहिती नव्हतं. सेटवर त्यांना ते शिकवलं गेलं असंही रिंकूने सांगितलं.
advertisement
9/9
श्रावणातल्या नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाई हा उत्सव खान्देशात साजरा केला जातो. रिंकूने हे सगळं पाहिल्यांदा अनुभवलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पिवळी पैठणी, डोक्यावर पदर, 'आशा'च्या सेटवर रिंकू राजगुरूने पहिल्यांदा केली ही गोष्ट; खान्देशशी खास कनेक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल