RJ महावशला ट्रोल करताय? हा फोटो पाहून पुन्हा हिंमतच होणार नाही, NDA च्या नेत्याचा फुल्ल सपोर्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
RJ Mahvash with Chirag Paswan : आरजे महवशने चिराग पासवानसोबत फोटो शेअर करत धमकी दिली, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे.
advertisement
1/7

मुंबई: आपल्या डान्समुळे आणि मजेशीर व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असणारी लोकप्रिय आरजे महवश आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
advertisement
2/7
क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत नाव जोडलं जाण्यापूर्वीच तिची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे. पण आता तिने थेट एका मोठ्या राजकारण्यासोबत फोटो पोस्ट केल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
3/7
आरजे महवशने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती बिहारमधील मोठे राजकारणी आणि एनडीएचा महत्त्वाचा चेहरा चिराग पासवान यांच्यासोबत दिसत आहे. देशात एनडीएचं सरकार आहे आणि चिराग पासवान यांच्यासोबत दिसताच महवशने लोकांना थेट धमकी दिली आहे.
advertisement
4/7
हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे आणि त्यासोबत दिलेलं कॅप्शन वाचून सगळेच थक्क झाले आहेत. महवशने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “बस अब करी ना किसी ने बदतमीज़ी, घर से उठवा लूंगी.” (आता जर कोणी मस्ती केली तर, थेट घरातून उचलून घेऊन जाईन). महवशने चिराग पासवान यांच्यासोबत स्टाईलिश पोझ दिली आहे.
advertisement
5/7
महवशने ही धमकी खरंच गंभीरपणे दिलेली नाही, हे तिच्या फॉलोअर्सना माहीत आहे. ती तिच्या विनोदी स्वभावासाठी ओळखली जाते. त्यामुळे तिच्या या पोस्टवर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.
advertisement
6/7
एका युजरने लिहिलं आहे, “आता बिहारी वाली बात केलीस!” तर दुसरा म्हणाला, “आता तर घरातून नाही, थेट जगातूनच उचलून नेण्याची भीती वाटतेय.” एका युजरने महवश आणि चिराग पासवान या दोघांनाही 'सर्वात सुंदर राजकारणी आणि सर्वात सुंदर आरजे' असं म्हटलं आहे.
advertisement
7/7
यावरून हे स्पष्ट होतं की, महवशने ही पोस्ट फक्त मजेसाठी शेअर केली आहे आणि तिची ही वेगळी स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
RJ महावशला ट्रोल करताय? हा फोटो पाहून पुन्हा हिंमतच होणार नाही, NDA च्या नेत्याचा फुल्ल सपोर्ट