TRENDING:

आतापर्यंत 6 वेळा फुटलायं सलमान खानच्या ब्रेस्लेटमधील 'तो' खडा; त्यामागचं रहस्य वाचून व्हाल हैराण

Last Updated:
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. सलमानच्या चित्रपटांपासून ते वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होते. त्याच्या हातातल्या एका गोष्टीचं चाहत्यांना नेहमीच कुतूहल वाटलं आहे, ते म्हणजे त्याचं ब्रेसलेट आणि त्यातील निळा खडा. करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून सलमानच्या हातात हे ब्रेसलेट आहे. पण वर्षानुवर्षे सलमान खान हे ब्रेसलेट का घालत आहे, त्यामागे काय कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
advertisement
1/8
6 वेळा फुटला सलमानच्या ब्रेस्लेटमधील तो खडा; त्यामागचं रहस्य वाचून व्हाल थक्क
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. सलमानच्या चित्रपटांपासून ते वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होते. त्याच्या हातातल्या एका गोष्टीचं चाहत्यांना नेहमीच कुतूहल वाटलं आहे, ते म्हणजे त्याचं ब्रेसलेट आणि त्यातील निळा खडा.
advertisement
2/8
करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून सलमानच्या हातात हे ब्रेसलेट आहे.
advertisement
3/8
सलमान खानच्या हातातल्या ब्रेस्लेटची उत्सुकता चाहत्यांना पहिल्यापासूनच आहे. त्याचं हे ब्रेसलेट तुफान लोकप्रिय झालं. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सलमानच्या या ब्रेसलेटने सगळ्यांना भुरळ घातली.
advertisement
4/8
आज कुठल्याही ऑनलाईन साईटवर किंवा गावातील जत्रेतसुद्धा सलमान सारखं दिसणारं ब्रेसलेट सहज मिळतं. पण सलमानकडे असलेलं ओरिजनल ब्रेसलेट मात्र इतकं साधंसुधं नाही.
advertisement
5/8
सलमानने काही वर्षांपूर्वी स्वतः तो हे ब्रेसलेट का घालतो याचा खुलासा केला होता. याविषयी बोलताना तो म्हणाला होता की, 'मी पहिल्यांदा माझ्या वडिलांच्या हातातील हे ब्रेसलेट पाहिलं. तेव्हा मला त्याचं खूप आकर्षण होतं. मी करिअरला सुरुवात करताच वडिलांनी मला त्यांच्यासारखंच हे एक ब्रेसलेट दिलं.'
advertisement
6/8
सलमान या खड्याविषयी बोलताना म्हणाला होता की, 'त्यापैकी एक गीक आहे आणि दुसरा फिरोजा आहे. जर कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या दिशेने येत असेल तर हा दगड प्रथम ती शोषून घेतो. या दगडात शिरा आहेत, ज्या हे काम करतात.'
advertisement
7/8
'नकारात्मक ऊर्जा शोषून घेतल्यानंतर हा खडा आपोआप फुटतो.' असा खुलासा सलमाननं केला होता. सलमानकडे सध्या सातवा खडा आहे.
advertisement
8/8
या खास खड्याविषयी सांगायचं तर अस्सल फिरोजा दगड शोधणे सोपे नाही. हा सर्वात मौल्यवान खड्यांपैकी एक मानला जातो. इराण गेल्या 2000 वर्षांपासून त्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरवठादार आहे. फिरोजाला त्याच्या रंगामुळे पृथ्वीवरील स्वर्गाचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. या कारणास्तव त्याचा वापर इराणी स्थापत्यशास्त्रात, विशेषत: राजवाड्यांच्या बांधकामात सामान्य आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आतापर्यंत 6 वेळा फुटलायं सलमान खानच्या ब्रेस्लेटमधील 'तो' खडा; त्यामागचं रहस्य वाचून व्हाल हैराण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल