TRENDING:

Salman Khan Security: सलमान खानला दिली Y+ सेक्युरिटी, भाईजानच्या सुरक्षेसाठी सरकार किती पैसे खर्च करणार?

Last Updated:
Salman Khan Security: बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सलमानला Y प्लस सुरक्षा सरकारने दिली. सलमान खानच्या सुरक्षेसाठी सरकारला किती खर्च आला? आकडा वाचून डोकं चक्रावेल.
advertisement
1/7
सलमानला दिली Y+ सेक्युरिटी, भाईजानच्या सुरक्षेसाठी सरकार किती पैसे खर्च करणार?
बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सलमानला Y प्लस सुरक्षा सरकारने दिली. सलमान खानच्या सुरक्षेसाठी सरकारला किती खर्च आला? आकडा वाचून डोकं चक्रावेल.
advertisement
2/7
बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न होता. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. त्याला सरकारकडून Y प्लस सुरक्षा देण्यात आली. या सुरक्षेत सलमानसोबत 25 सुरक्षा रक्षक असतात. यातील 2 ते 4 NSG कमांडो असतात.
advertisement
3/7
Y प्लस सुरक्षेत पोलीस दोन शिफ्टमध्ये काम करतात. या सुरक्षा दलासोबत 2 ते 3 गाडी असतात. यामध्ये बुलेट प्रुफ गाडीदेखील असते. Y प्लस सेक्युरिटीचा खर्च महिन्याला अंदाजे, 12 लाख रुपये असतो. यानुसार वर्षभराचा आकडा दीड कोटींच्या घरात जातो.
advertisement
4/7
सलमान खानवर सेक्युरिटीसाठी होणारा खर्च कोटींमध्ये आहे. Y प्लस सेक्युरिटी, मुंबई पोलीस सेक्युरिटी, सलमान खानची पर्सनल सेक्युरिटी या सगळ्यांचा मिळून खर्चाचा आकडा 3 कोटीच्या आसपास आहे.
advertisement
5/7
सलमान खानला लॉरेंस बिश्नोई गॅंगकडून धमक्या मिळत आहेत. एवढंच नाही तर त्याच्या वडिलांनाही धमकी मिळाली होती. त्यामुळे सध्या खान कुटुंबिय चिंतेत आहेत.
advertisement
6/7
सलमान सोबत असलेल्या मैत्रीमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर केवळ भाईजानचे चाहतेच नाही तर संपूर्ण खान कुटुंब भयभीत झालं आहे.
advertisement
7/7
सलमान खानसोबत मैत्री असलेल्या लोकांना बिश्नोई गॅंग टार्गेट करत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे सलमान आणि कुटुंबियांवर चिंतेचं सावट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Salman Khan Security: सलमान खानला दिली Y+ सेक्युरिटी, भाईजानच्या सुरक्षेसाठी सरकार किती पैसे खर्च करणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल