TRENDING:

Thackeray 2 Movie Update : 'ठाकरे 2' ची स्क्रिप्ट गिरवली, ती कोणाला सापडली?

Last Updated:
Thackeray 2 Movie Update : धर्मवीर आणि धर्मवीर 2 या दोन्ही सिनेमांनी मागील 2 वर्ष सर्वांचं लक्ष वेधलं. याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील ठाकरे या नावाने एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ठाकरे 2 देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार होता. ठाकरे 2 ची स्क्रिप्ट देखील लिहिण्यात आली. पण सिनेमाचं पुढे काय झालं? सिनेमाच्या लेखकाने ठाकरे 2 विषयी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
advertisement
1/9
Thackeray 2 Movie Update : 'ठाकरे 2' ची स्क्रिप्ट गिरवली, ती कोणाला सापडली?
सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहत आहेत. याच काळात राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रपट काही चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले.
advertisement
2/9
मागील २ वर्षात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे' आणि 'धर्मवीर: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' हे २ सिनेमे रिलीज झाले.
advertisement
3/9
या दोन्ही सिनेमांमध्ये आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यातील अनेक राजकीय संबंध दाखवण्यात आले होते.
advertisement
4/9
'धर्मवीर' या सिनेमाच्या आधी २०१९ साली शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा सिनेमा रिलीज झाला होता.
advertisement
5/9
'ठाकरे' सिनेमाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 'ठाकरे' नंतर 'ठाकरे २' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र २०१९ नंतर पाच वर्ष झाले तरी 'ठाकरे २' ची कुठेच चर्चा नाही.
advertisement
6/9
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे नेते संजय राऊत यांनी मटा कट्टावर बोलताना 'ठाकरे २' विषयी खुलासा केला.
advertisement
7/9
संजय राऊत म्हणाले, "माझ्या घरावर जेव्हा ईडीची धाड पडली, तेव्हा कपाटातील अनेक फायली त्यांनी उचलल्या. त्यात त्यांना 'ठाकरे २'ची स्क्रिप्टही सापडली. त्यात अनेक ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या संवादात राजकीय आकडेवारीचे संदर्भ होते."
advertisement
8/9
"कदाचित अधिकाऱ्यांना ती हिशोबाची फाइल वाटली आणि ते घेऊन गेले. तेव्हापासून मी ती स्क्रिप्ट मागतोय, पण ती द्यायला ईडीचे अधिकारी न्यायालयात नकार देत आहेत! पण या सिनेमाचा दिग्दर्शक मीच असेन."
advertisement
9/9
ठाकरे या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने बाळासाहेब ठाकरे यांची प्रमुख भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री अमृता राव सिनेमा माँ साहेबांच्या भूमिकेत होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Thackeray 2 Movie Update : 'ठाकरे 2' ची स्क्रिप्ट गिरवली, ती कोणाला सापडली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल