'डंकी' का ठेवलंय शाहरुख खानच्या चित्रपटाचं नाव? या शब्दाचा खरा अर्थ वाचून व्हाल चकित
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान स्टारर चित्रपट 'डंकी' आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहरुखच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना खूपच अपेक्षा आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव खूप लोकांना आकर्षित करत आहे, परंतु अनेकांना त्याचा अर्थ नेमका काय याविषयी खूप उत्सुकता आहे.
advertisement
1/8

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान स्टारर चित्रपट 'डंकी' आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहरुखच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना खूपच अपेक्षा आहेत.
advertisement
2/8
चित्रपटाचे नाव 'डंकी' असं का आहे याची अनेकांना उत्सुकता होती. 'डंकी' म्हणजे गाढव का असा प्रश्नही अनेकांना पडला होता.
advertisement
3/8
पण चित्रपटाचं नाव 'डंकी' याचा अर्थ गाढव असा नसून तो अर्थ दुसऱ्या देशात प्रवेश घेणे या अर्थाशी संबंधित आहे.
advertisement
4/8
'डंकी' हा चित्रपट दुसऱ्या देशात होणाऱ्या अवैध प्रवेशाशी संबंधित आहे. चित्रपटातील सगळ्या पात्रांना दुसऱ्या देशात जायचं असतं, त्याच्यासाठी ते काय खटाटोप करतात याभोवती सगळी कथा फिरते.
advertisement
5/8
याच चित्रपटाच्या कथेमुळं याचं नाव डंकी असं ठेवण्यात आलं आहे. यामागे नक्की काय कारण आहे तेही जाणून घेऊया.
advertisement
6/8
कोणत्याही देशात अवैधरित्या म्हणजेच व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय केलेल्या प्रवेशाला 'डंकी' असं म्हणतात.
advertisement
7/8
देशात प्रवेश मिळवण्यासाठी ज्या अवैध मार्गाचा वापर केला जातो त्याला डंकी मार्ग म्हणतात. अनेक देशांमध्ये हे डंकी मार्ग असतात ज्यातून लोक बेकायदेशीरपणे प्रवास करतात.
advertisement
8/8
भारतातील अनेक राज्यांमध्ये 'डंकी' चा व्यवसाय पसरलेला आहे, ज्यामध्ये लोकांना अवैधरित्या इतर देशांमध्ये पाठवले जाते. त्यामुळेच शाहरुख खानच्या या चित्रपटाचं नाव डंकी असं ठेवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'डंकी' का ठेवलंय शाहरुख खानच्या चित्रपटाचं नाव? या शब्दाचा खरा अर्थ वाचून व्हाल चकित