'My Angel पुन्हा भेटू...', प्रियाच्या जाण्याचं दु:ख महिनाभर मनात साठवलं, अखेर व्यक्त झाला शंतनु
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shantanu Moghe - Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेचा मृत्यू होऊन एक महिना झाला आहे. तिच्या मृत्यूनंतर तिचा नवरा अभिनेता शंतनु मोघे पहिल्यांदा व्यक्त झाला आहे. शंतनुने प्रियासाठी भावुक पोस्ट लिहिली आहे.
advertisement
1/9

अभिनेत्री प्रिया मराठेचा 31ऑगस्ट रोजी कॅन्सरने मृत्यू झाला. प्रियाच्या मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. प्रियाच्या निधनानंतर तिचा नवरा शंतनु मोघेवर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रियाच्या निधनाच्या पंधरा दिवसांनी त्याने कामाला सुरूवात केली.
advertisement
2/9
प्रियाला शेवटपर्यंत साथ देणारा शंतनु तिच्या निधनानंतर पहिल्यांदा व्यक्त झालाय. शंतनुने प्रियाच्या निधनाच्या एक महिन्यानंतर पहिली पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
3/9
शंतनुने प्रियासोबतचे त्यांचे फ्लाइटमधले फोटो शेअर केलेते. फोटो शेअर करत शंतनुनं लिहिलंय, "ज्यांनी फोन कॉल्स, ई-मेल्स, WhatsApp, X, Instagram, Facebook आणि अशा अनेक माध्यमांतून प्रियाबद्दलचं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त केले त्यांच्यासाठी ही एक कृतज्ञता पोस्ट आहे. "
advertisement
4/9
"कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, चाहते आणि फॉलोअर्स, ओळखीचे आणि अगदी अनोळखी ज्यांनी आपली भावना इतक्या मनापासून व्यक्त केली, त्यांचे मनःपूर्वक आभार"
advertisement
5/9
"तुमची खरी भावना, दु:ख आणि काळजी सगळं अगदी स्पष्ट जाणवलं. सर्व बाजूंनी आलेल्या आशीर्वादांनी आणि काळजींने पुन्हा एकदा मानवतेवरचा विश्वास दृढ केला. God bless you all."
advertisement
6/9
शंतनुने पुढे लिहिलंय, "आज एक महिना पूर्ण झाला आहे. वैयक्तिक दु:ख आणि शोक शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे. इतक्या प्रेमळ, सकारात्मक आणि निर्मळ आत्म्याचा हा अकाली, अन्यायकारक, दुर्दैवी आणि अनपेक्षित निरोप आमचं मन हेलावून गेला.
advertisement
7/9
"पण तिनं अनगिनत हृदयांना स्पर्श केला आणि तो कसा! आपल्या कामातून, कलाकृतीतून, प्रेमातून, काळजीतून, दयाळूपणातून, वागणुकीतून, संवेदनशीलतेतून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या कृतीतून आणि तिच्या वायबमधून. जे वर उल्लेखलेल्या प्रत्येक गोष्टीशी अचूक जुळलं."
advertisement
8/9
शंतनुने पोस्टच्या शेवटी लिहिलंय, "पुन्हा एकदा मनापासून आभार, तुमच्या सारख्या सुंदर लोकांचे, जे नेहमी आमच्या सोबत उभे राहिलात सुखात आणि दुःखात. तुम्हा सर्वांना प्रेम आणि शुभेच्छा. मनःपूर्वक कृतज्ञता."
advertisement
9/9
"देवांनो... तिची काळजी घेण्यात, तिला प्रेम करण्यात आता एकही चूक क्षमा केली जाणार नाही. माय एन्जल, पुन्हा भेटू."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'My Angel पुन्हा भेटू...', प्रियाच्या जाण्याचं दु:ख महिनाभर मनात साठवलं, अखेर व्यक्त झाला शंतनु