16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात पडला गायक, 50व्या वर्षीय थाटला दुसरा संसार; झालेले लैंगिक छळाचे आरोप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Singer Wedding : मनोरंजन विश्वात लगीनसराईला सुरुवात झाली आहे. अशातच एका प्रसिद्ध सिंगर जोडीनं लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. गायक 50 वर्षांचा आहे तर त्याची बायको त्याच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे.
advertisement
1/8

अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'टू स्टेट्स' या सिनेमात 'मस्त मगन' गाण्याची गायिका चिन्मयी श्रीपाद हिने हिने गायक श्रीपाद रघुवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर 2019मध्ये त्याचा कोरिओग्राफर पत्नी मयुरी उपाध्याय हिच्याबरोबर डिवोर्स झाला. त्यानंतर तो सिंगल आयुष्य जगत होता. दरम्यान आता 34वर्षीय गायिकेबरोबर नव्याने संसार थाटला आहे.
advertisement
2/8
गायक रघु दीक्षित याने गायिका वरिजाश्री वेणुगोपाल हिच्याशी लग्न आहे. रघु 50 वर्षांचा आहे तर वरिजाश्री त्याच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. वरिजाश्री एक गायिका आणि संगीत शिक्षिका आहे. रघु आणि वरिजाश्रीने फोटो पोस्ट करत त्यांच्या लग्नाची बातमी दिली आहे.
advertisement
3/8
पोस्टमध्ये त्यांच्या लग्नाचा एक फोटो आहे. दोघेही एका झोपाळ्यावर बसले असून एकमेकांकडे पाहून हसत आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, "आमच्या वडीलधाऱ्या, कुटुंबियांच्या आणि प्रियजनांच्या आनंद आणि पाठिंब्यासाठी आशीर्वादाने या नवीन प्रवासाला सुरुवात करताना आनंद होत आहे. तुमचे प्रेम आणि कृपा कायम ठेवा. वारी आणि रघु."
advertisement
4/8
रघु दीक्षित आणि वरिजाश्री यांनी लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. पण दोघांनी 14 ऑक्टोबर रोजी लग्न केल्याचं बोललं जात आहे. रघु आणि वरिजाश्रीच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेत्री यमुना श्रीनिधीनं देखील हजेरी लावली होती.
advertisement
5/8
यमुना यांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाची झलक शेअर केली. रघु आणि वरिजाश्री त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करताना आनंदी दिसत होते.
advertisement
6/8
रघुने लग्नाच्या दिवशी मरून बॉर्डर असलेले कपडे परिधान केले होते. तर वरिजाश्रीने केशरी रंगाची साडी नेसली होती. पारंपारिक लग्नाच्या दागिन्यांसह ती नवरीच्या रुपात सुंदर दिसत होती.
advertisement
7/8
फेब्रुवारी महिन्यात रघु दीक्षितने वरिजाश्रीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये तिच्या ग्रॅमी नॉमिनेशनचं त्यानं कौतुक केलं होतं. त्यावेळी रघूनं तिला आपली 'मैत्रीण' म्हटलं होतं. दोघांच्या बॉन्डिंगवर भाषअय केलेलं.
advertisement
8/8
गायक रघूचं हे दुसरं लग्न आहे. 2005 मध्ये त्याने कोरिओग्राफर आणि डान्सर मयुरी उपाध्यायशी लग्न केलं होतं. रघू आणि मयुरीचा 2019 मध्ये डिवोर्स झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
16 वर्षांनी लहान गायिकेच्या प्रेमात पडला गायक, 50व्या वर्षीय थाटला दुसरा संसार; झालेले लैंगिक छळाचे आरोप