Smita Patil Sisters : स्मिता पाटीलच्या बहिणींना पाहिलंय का! सौंदर्यात हिरोईनपेक्षा नाहीत कमी, सहावा फोटो तर पाहतच राहाल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Smita Patil Sisters : दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांनी दोन बहिणी आहेत. त्यांच्या बहिणी एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नाहीत. तुम्ही पाहिलात का बहिणींचा एकत्र फोटो?
advertisement
1/8

स्मिता पाटील हे नाव घेतल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर तिचं हसू आणि प्रभावित करणारी प्रतिमा उभी राहते. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक स्मिता पाटील आहे.
advertisement
2/8
राजकीय वातावरण असलेल्या घरात लहानाची मोठी झालेली स्मिता मोठी होऊन अभिनय क्षेत्रात रमली. तिच्यासारखं सौंदर्य आजवर कधीच सिनेसृष्टीत दिसलं नाही असं म्हणतात.
advertisement
3/8
स्मिता पाटीलच्या सौंदर्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सगळेच बोलतात. पण तुम्हाला माहिती आहे का स्मिता यांच्या दोन बहिणी आहे. दोघीही त्यांच्याच इतक्याच सुंदर आणि प्रतिभावान आहेत?
advertisement
4/8
स्मिता पाटीलला दोन बहिणी आहेत. डॉ. अनिता पाटील देशमुख आणि मान्या पाटील सेठ. स्मिता पाटील यांच्या दोन बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
advertisement
5/8
त्यांची मोठी बहीण अनिता पाटील देशमुख या नवजात शिशु तज्ज्ञ (neonatologist) आहेत. त्या मुंबईतील एका संशोधन संस्थेच्या कार्यकारी संचालक म्हणून काम करतात.
advertisement
6/8
अनिता पाटील देशमुख यांचं लग्न शंकर देशमुख यांच्याशी झाले असून त्यांना वरुण आणि आदित्य अशी दोन मुलं आहेत. त्यांच्या नातीचे नाव झोई स्मिता देशमुख आहे. नातीचं नाव स्मिता पाटील यांची आठवण म्हणून ठेवण्यात आलं.
advertisement
7/8
स्मिता पाटील यांची धाकटी बहीण मान्या पाटील सेठ या कॉस्च्युम डिझायनर होत्या. सध्या त्या स्मिता पाटील फाउंडेशनचे नेतृत्व करतात. दोन्ही बहिणींचं स्मिता पाटीलवर खूप प्रेम होतं. त्यांच्या निधनानंतर दोघींनाही मोठा धक्का बसला होता.
advertisement
8/8
मान्या पाटील सेठ यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, "स्मिता ही अशी अभिनेत्री आहे जी इतिहासात नेहमी लक्षात राहील. तिला कधीही विसरता येणार नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Smita Patil Sisters : स्मिता पाटीलच्या बहिणींना पाहिलंय का! सौंदर्यात हिरोईनपेक्षा नाहीत कमी, सहावा फोटो तर पाहतच राहाल