Smriti Mandhana : अमिताभ बच्चनला सांगितला होता कसा हवा लाईफ पार्टनर, स्मृती मानधनाचं ते स्टेटमेन्ट पुन्हा चर्चेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Smriti Mandhana : पलाश मुच्छलबरोबर लग्न पोस्टपोन झाल्यानंतर स्मृती मानधनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने तिला कसा पार्टनर हवा आहे हे थेट बिग बी अमिताभ बच्चन यांना सांगितलं होतं.
advertisement
1/7

क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अचानक पोस्टपोन करण्यात आलं. 23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी दोघे लग्नबंधनात अडकणार होते. पण लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यानंतर पलाशचीही तब्येत बिघडली.
advertisement
2/7
स्मृती आणि पलाश यांचं लग्न पोस्टपोन करण्यात आलं आहे असं सांगण्यात आलं आणि काही तासात स्मृतीने दोघांचे सगळे फोटो डिलिट केले. स्मृती आणि पलाश यांच्यात काही तरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणीही भाष्य केलेलं नाही.
advertisement
3/7
दरम्यान स्मृतीच्या लग्नाच्या गोंधळात तिची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यात तिने तिचा नवरा कसा हवा आहे हे सांगितलं होतं. स्मृती मानधना अमिताभ बच्चन यांच्या केबीसीमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिला एका चाहत्यानं तुला कसा पार्टनर हवा आहे असा प्रश्न विचारला होता.
advertisement
4/7
या प्रश्नाचं उत्तर देत स्मृती म्हणाली, "चांगला मुलगा असणं सर्वात महत्त्वाचं आहे." यावर अमिताभ बच्चन यांनी स्मृतीला जरा डिटेलमध्ये सांग असं म्हटलं.
advertisement
5/7
त्यावर स्मृती पुढे म्हणाली, "तो केअरिंग असावा आणि माझ्या खेळाला सपोर्ट करणारा असावा. या दोन क्वालिटी पार्टनरमध्ये असायला हव्यात. कारण मी त्याला जास्त वेळ देऊ शकणार नाही, या गोष्टीची त्याला जाणीव असायला हवी. पार्टनमध्ये या दोन गोष्ट माझ्यासाठी टॉप प्रायोरिटी आहेत. मी पार्टनरमध्ये या दोन क्वालिटी पाहते."
advertisement
6/7
पलाश आणि स्मृती 6 वर्ष एकमेकांना डेट करत होते. सहा वर्षांच्या प्रेमानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण ऐन लग्नावेळी दोघांमध्ये काय बिनसलं याबद्दल कोणालाच माहिती नाही.
advertisement
7/7
स्मृतीने पलाशबरोबरचे सगळे फोटो डिलिट केलेत. त्याचबरोबर पलाशनने स्मृतीसोबत चीट केलं असंही म्हटलं जात आहे. पलाशने एका मॉडेलबरोबरचे चॅट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चॅट्समुळे हे प्रकरण आणखी चर्चेत आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Smriti Mandhana : अमिताभ बच्चनला सांगितला होता कसा हवा लाईफ पार्टनर, स्मृती मानधनाचं ते स्टेटमेन्ट पुन्हा चर्चेत