TRENDING:

40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर, शेअर केले मॅटर्निटी फोटोशूटचे PHOTO

Last Updated:
Sonam Kapoor Baby Bump : अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार असून तिने आता सोशल मीडियावर मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
advertisement
1/7
सोनम कपूरने शेअर केले मॅटर्निटी फोटोशूटचे PHOTO
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली होती. अशातच आता अभिनेत्रीने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
advertisement
2/7
सोनम कपूर गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. अभिनेत्री सध्या आपला पूर्ण वेळ मुलगा वायु आहूजाला देत आहे.
advertisement
3/7
सोनम कपूर पहिल्या प्रेग्नंसीप्रमाणे दुसऱ्या प्रेग्नंसीदरम्यानही चांगलीच सक्रीय आहे. सोनम कपूर अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
advertisement
4/7
सोनम कपूरने नुकतेच आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे अर्थात मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय.
advertisement
5/7
सोनम कपूर या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत तिने मॅचिंग धोती स्टाइल सलवार परिधान केला आहे.
advertisement
6/7
सोनम कपूरना आपला मॅटर्निटी फोटोशूटचा लुक ग्लॉसी मेकअप, बांधलेले केस, मोठे झुमके आणि हातात कडे घालुन पूर्ण केला आहे. तसेच हाहात तिने एक छोटी बॅगदेखील घेतली आहे. फोटो शेअर करत सोनम कपूरने कॅप्टशनमध्ये लिहिलं आहे,"दिल बदलता नहीं... बस औरों के लिए धडकने लगता है".
advertisement
7/7
सोनम कपूर याआधी बॉस लेडी लुकमध्ये बेबी बंप फ्लॉन्स करताना दिसली होती. तिचे हे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. सोनम सध्या आपल्या प्रकृतीकडे लक्ष देताना दिसतेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर, शेअर केले मॅटर्निटी फोटोशूटचे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल