TRENDING:

या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर साऊथचा बोलबाला, एक-दोन नव्हे या 8 फिल्म होतायत रिलीज

Last Updated:
South Movies Releasing in Theatre : बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात साऊथचे एक-दोन नव्हे तर आठ चित्रपट रिलीज होणार आहेत. यात चिरंजीवीच्या सिनेमाचाही समावेश आहे.
advertisement
1/8
या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर साऊथच्या एक-दोन नव्हे 8 फिल्म होतायत रिलीज
कोडामा सिंहम : चिरंजीवी स्टार 'कोडामा सिंहम' ही एक वेस्टर्न अॅक्शन, अॅडवेंचर फिल्म आहे. याचा ओरिजनल सिनेमा 9 ऑगस्ट 1990 रोजी रिलीज झाला होता. आता 35 वर्षांनी पुन्हा एकदा 21 नोव्हेंबर 2025 रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. ब्रिटिश सरकारच्या काळातील गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. के. मुरली मोहन राव दिग्दर्शित या चित्रपटात चिरंजीवी, राधा, सोनम खान, मोहन बाबू, सत्यनारायण, प्राण, टायगर प्रभाकर, सुधाकर, वाणी विश्वनाथ, रंगनाथ, अल्लू रामलिंगैया, ब्रम्हानंदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही तेलुगू फिल्म आता 21 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
advertisement
2/8
येलो : 'येलो' या चित्रपटाचं कथानक 9 ते 5 नोकरी करणाऱ्या एका मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. हरि महादेवन दिग्दर्शित 'येलो' या चित्रपटात पूर्णिमा रवी, वैभव मुरुगेसन, साई प्रसन्ना सी, नमिता कृष्णमूर्ती, दिल्ली गणेश, प्रभु सोलोमन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा तामिळ चित्रपट 21 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
advertisement
3/8
पांच मीनार : 'पांच मीनार' हा एक रहस्यमय चित्रपट आहे. राम कदुमुला दिग्दर्शित या चित्रपटात राज तरुण, राशी सिंह, अजय घोष, ब्रह्माजी, श्रीनिवास रेड्डी, नेल्लोर सुदर्शन रेड्डी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 21 नोव्हेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
advertisement
4/8
मिडिल क्लास : 'मिडिल क्लास' हा चित्रपट कार्ल मार्क्सवर आधारित आहे. स्वप्न साकार करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कसे अडथळे येतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. किशोर मुथुरामलिंगम दिग्दर्शित या चित्रपटात मुनीशकांत, विजयलक्ष्मी अगशियान, राधा रवी, काली वेंकट, मालविका अविनाश, वेला राममूर्ती हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 21 नोव्हेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
advertisement
5/8
प्रेमांते : 'प्रेमांते' ही एका अशाची जोडीची कहाणी आहे जे एका भेटीनंतर लगेचच संसार थाटण्याचा निर्णय घेतात. हा एक तेलुगू रोमँटिक कॉमेडी ड्रामा असणारा चित्रपट आहे. नवनीत श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात प्रियदर्शी पुलिकोंडा, आनंदी, सुमा कनकला, वेनेला किशोर, हायपर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 21 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
advertisement
6/8
12 ए रेलवे कॉल्नी : 12 ए रेलवे कॉलनीचं कथानक कार्तिक नामक एक तरुणावर भाष्य करणारं आहे. नानी कासरगड्डा दिग्दर्शित या चित्रपटात अल्लारी नरेश, कामाक्षी भास्करला, साईकुमार पुदीपेड्डी, विवा हर्ष, गेटअप श्रीनु, जीवन कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
7/8
थियवर कुलाई नाडुंगा : थियवर कुलाई नाडुंगा या चित्रपटाची कथा लेथिका जेबा यांच्या मृत्युभोवती फिरणारी आहे. 21 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अर्जुन सरजा, ऐश्वर्या राजेश, रामकुमार गणेशन, प्रवीण राजा, लोगू एनपीकेएस आणि अबिरामी वेंकटचलम हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. दिनेश लक्ष्मणने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
advertisement
8/8
मास्क : विकर्णन अशोक दिग्दर्शित 'मास्क' हा चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कविन, एंड्रिया जेरेमिया, रुहानी शर्मा, चार्ले, बाला सरवनन, अर्चना चंदोके, जॉर्ज मॅरीन, आदुकलम नरेन आणि सुब्रमण्यम शिवा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर साऊथचा बोलबाला, एक-दोन नव्हे या 8 फिल्म होतायत रिलीज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल