TRENDING:

सुदेश भोसलेंच्या लेकीचं शुभमंगल सावधान! मराठमोळ्या अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ, PHOTO VIRAL

Last Updated:
Sudesh Bhosle Daughter Wedding : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांची कन्या श्रुती भोसले नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
advertisement
1/8
सुदेश भोसलेंच्या लेकीचं शुभमंगल सावधान! मराठमोळ्या अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक आणि व्हॉईस आर्टिस्ट सुदेश भोसले यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सुदेश भोसले यांची कन्या श्रुती भोसले नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
advertisement
2/8
श्रुतीने मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता प्रतिक देशमुख याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
advertisement
3/8
प्रतिक देशमुखने स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत, "10/11/2025" असे कॅप्शन दिले आहे. काल, १० नोव्हेंबर २०२५ रोजी हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
advertisement
4/8
विवाह सोहळ्यासाठी वधू श्रुतीने पारंपरिक लाल रंगाची साडी परिधान केली होती. तिने कुंदनहार, कानातले आणि नथ असे साधे पण आकर्षक दागिने घातले होते. केसात गजरा माळून तिने आपला पारंपारिक लूक पूर्ण केला.
advertisement
5/8
नवरदेव प्रतिक देशमुखने या खास प्रसंगी खास शेरवानी परिधान केली होती. या पारंपारिक लूकमध्ये दोघांची जोडी अत्यंत सुंदर दिसत होती. चाहते या नव्या जोडप्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत.
advertisement
6/8
श्रुती आणि प्रतिकच्या लग्नाला दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र-मंडळी उपस्थित होती. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
advertisement
7/8
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. तेजश्री आणि प्रतिक यांची चांगली मैत्री आहे.
advertisement
8/8
सुदेश भोसले हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार विशेषतः अमिताभ बच्चन यांना आवाज देण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कन्या श्रुतीने मराठीतील लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्नगाठ बांधल्यामुळे सुदेश भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुदेश भोसलेंच्या लेकीचं शुभमंगल सावधान! मराठमोळ्या अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ, PHOTO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल