Thane: ठाण्यात इमारतीला लागली आग, दृश्य पाहून सगळेच हैराण, PHOTOS समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कशिश पार्क परिसरात एका इमारतीला आग लागली होती.
advertisement
1/6

ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कशिश पार्क परिसरात एका इमारतीला आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीचे दृष्य पाहून ठाणेकर अवाक् झाले होते.
advertisement
2/6
ठाण्यातील कशिश पार्क परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली. कशिश पार्कमध्ये जवळपास १२०० कुटुंब राहतात. या रहिवासी इमारतीच्या बाजूला एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं.
advertisement
3/6
रात्री काही जण रस्त्यावर फटाके फोडत होते. या फटाक्यांमुळे इमारतीला आग लागली. बांधकाम सुरू असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीला प्लास्टिकची सेफ्टी नेट बांधण्यात आली होती. या नेटला आग लागली.
advertisement
4/6
बघता बघता प्लास्टिकच्या नेटने आगीचं रौद्ररुप धारण केलं. इमारतीला लावलेल्या या प्लास्किटची नेट जळून खाक झाली. आगीचे दृष्य पाहून इमारतीला कुणी लायटिंग लावली का, असं दृश्य पाहण्यास मिळालं.
advertisement
5/6
त्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि आग आटोक्यात आणलली.
advertisement
6/6
फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे इमारतीच्या सेफ्टी नेटला आग लागली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Thane: ठाण्यात इमारतीला लागली आग, दृश्य पाहून सगळेच हैराण, PHOTOS समोर