Govinda - Sunita : 'लोक फसवून लाखोंची पूजा करवून घेतात', गोविंदाच्या अंधश्रद्धेवर सुनीता थेटच बोलली
- Published by:Minal Gurav
 
Last Updated:
Govinda - Sunita Ahuja : अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीताने पुन्हा एकदा गोविंदाच्या वाईट सवयींवर ताशेरे ओढलेत. गोविंदाच्या मित्रांबद्दल आणि त्याच्या अंधविश्वासाबद्दल ती बोलली आहे. 
advertisement
1/7

 अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चे असते. गोविंदाच्या अनेक गोष्टींचा खुलासा ती करताना दिसते.
advertisement
2/7
 नुकत्याच एका मुलाखतीत सुनीताने गोविंदा किती अंधविश्वासू आहे आणि त्यामुळे लोक त्याला लाखो रुपयांना कसे फसवतात याचा खुलासा केला.
advertisement
3/7
 पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना सुनीताने सांगितलं, "कितीतरी पंडित असे आहेत जे फक्त पैशांसाठी लोकांची दिशाभूल करतात. गोविंदाही अशाच पूजा करतो. त्याने केलेला पूजा पाठ काही कामाला येत नाही. देव तिचं प्रार्थना स्वीकारतो जी तुम्ही स्वत: करता."
advertisement
4/7
 सुनीताने गोविंदाच्या जवळचे लोकही कसे आहेत हे सांगितलं. ती म्हणाली, "ज्या टीमसोबत तो बसतो ते राइटर्स नाहीत ते मूर्ख आहेत. त्यांना चांगले लोक मिळत नाही. मी सत्य बोलते म्हणून त्या लोकांनी मी आवडत नाही."
advertisement
5/7
 सुनीताने तिच्या पर्सनल ड्रिम्सबाबत सांगितलं. तिला तिच्या उतार वयात ओल्ड एज आणि एनिमल शेल्टर बनवायचं आहे.
advertisement
6/7
 ती म्हणाली, "हे सगळं मला माझ्या स्वत:च्या पैशांनी करायचं आहे असं ठरवलं आहे. मला माहिती आहे गोविंदाकडून मला एक रुपयाही मिळणार नाही कारण तो मला नाही त्याच्या सगळ्या चमच्यांना पैसे देईल."
advertisement
7/7
 या मुलाखतीत बोलताना सुनीताने गोविंदाकडे पाच बेडरूम असलेलं घर देखील मागितलं आहे. आता ती आणि तिचं मुलं राहत असलेलं घर हे चार बेडरूम असलेलं आहे. पण ते छोट पडत असल्याचं सुनीताने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda - Sunita : 'लोक फसवून लाखोंची पूजा करवून घेतात', गोविंदाच्या अंधश्रद्धेवर सुनीता थेटच बोलली