Suruchi-Piyush Wedding : लग्नाआधी 'या' मालिकेत एकत्र दिसले होते पियुष-सुरूची; 90 कोटींची कमाई करणाऱ्या सिनेमातही केलं काम
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता पियुष रानडे यानं अभिनेत्री सुरूची अडारकरबरोबर तिसरं लग्न केलं. दोघांनी लग्नाआधी एकत्र काम केलेली ही मालिका तुम्हाला माहितीये का?
advertisement
1/12

अभिनेत्री सुरूची अडारकर आणि पियुश रानडे यांनी नुकतंच लग्न केलं. सुरूचीनं लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली.
advertisement
2/12
सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. सुरूची आणि पियुषच्या लग्नाची कुठेच चर्चा नव्हती. त्यामुळे दोघांच्या लग्नाची बातमी सगळ्यांना सुखद धक्का देऊन गेली.
advertisement
3/12
सुरूची आणि पियुष गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत.
advertisement
4/12
मागील अनेक वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करत असताना दोघांच्या रिलेशनशिपची कुठेच कुणकुण लागली नाही.
advertisement
5/12
दरम्यान हे दोघे नेमके भेटले कुठे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दोघांबद्दल सांगायचं झाल्यास, दोघांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे.
advertisement
6/12
2017 साली सुरूची आणि पियुष यांची एक मालिका टेलिव्हिजनवर सुरू होती. अंजली असं त्यांच्या मालिकेचं नाव होतं.
advertisement
7/12
मालिकेत सुरूची आणि पियुष प्रमुख भूमिकेत होते. भक्ती देसाई, हर्षद अटकरी, रेशम सारखे अनेक कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत होते.
advertisement
8/12
झी युवावर लागणाऱ्या अंजली या मालिकेला प्रेक्षकांनी अल्पावधीत चांगला प्रतिसाद दिला होता. दोघांची जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
advertisement
9/12
अंजली या मालिकेनंतर आता 2023मध्ये प्रसिद्ध मराठी सिनेमातही पियुष आणि सुरूची यांची काम केलं.
advertisement
10/12
बाईपण भारी देवा या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं आहे. पियुषनं सिनेमानं दीपा परबच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती.
advertisement
11/12
तर सुरूचीनं बाईपण भारी देवा या सिनेमात अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. दोघांचे फारसे एकत्र सीन्स सिनेमात नव्हते. मात्र दोघे या निमित्तानं एकत्र मोठ्या स्क्रिनवर दिसले.
advertisement
12/12
सुरूची अडारकर आणि पियुष रानडे यांनी एकत्र काम केलेल्या बाईपण भारी देवा या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर एकूण 90.5 कोटींची कमाई केली. मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत हा सिनेमा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suruchi-Piyush Wedding : लग्नाआधी 'या' मालिकेत एकत्र दिसले होते पियुष-सुरूची; 90 कोटींची कमाई करणाऱ्या सिनेमातही केलं काम