TRENDING:

Tejashri Pradhan : वो मेरे करीब है... नेमकं कोणाबद्दल बोलतेय तेजश्री प्रधान, फोटो व्हायरल

Last Updated:
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिचे लेटेस्ट साडीतील फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करत तिने 'वो मेरे करीब हैं' असं म्हटलं आहे. तेजश्री प्रधान नेमकं कोणाबद्दल बोलतेय?
advertisement
1/9
वो मेरे करीब है... नेमकं कोणाबद्दल बोलतेय तेजश्री प्रधान, फोटो व्हायरल
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेची नायिका आणि संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
2/9
काही दिवसांआधी तेजश्री प्रधान ही मालिका सोडणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण या चर्चांवर तेजश्रीनं पोस्ट लिहिलत असं काही नसल्याचं सांगितलं.
advertisement
3/9
तेजश्री मागील 10 वर्ष टेलिव्हिजनवर प्रमुख नायिका म्हणून काम करतेय. तिची क्रेझ आजही कायम आहे. तिच्या प्रत्येक मालिकेला प्रेक्षक तितकंच प्रेम देतात.
advertisement
4/9
तेजश्री प्रधान मालिकांबरोबरच सोशल मीडियावरही सक्रीय असते. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि मालिकांचे अपडेट ती शेअर करत असते. तेजश्रीची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोवर आहे.
advertisement
5/9
तेजश्रीनं नुकतीच एक नवी पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंमध्ये तिने साडी नेसली आहे. ती साडीत खूपच सुंदर दिसतेय. दरम्यान तेजश्रीनं हे फोटो शेअर करत वो मेरे करीब हैं, असं लिहिलं आहे.
advertisement
6/9
हे कॅप्शन वाचून तेजश्री नेमकं कोणाबद्दल बोलतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर तेजश्रीने तिच्या पुढच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
advertisement
7/9
तेजश्रीनं फुल स्लिव्स असलेली लेवेंडर कलरची शिमर साडी नेसली आहे. साडीत तिचं सौंदर्य खुलून दिसतंय. हटके पोझ देत तिनं फोटो क्लिक केलेत.
advertisement
8/9
तेजश्रीनं हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, "चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है. हो… ती माझ्याकडे आहे. खरं तर ती मीच आहे. हॅप्पी लाइफ"
advertisement
9/9
तेजश्रीच्या अत्यंत जवळ असलेली 'ती' म्हणजे ती स्वत: आहे असं तिनं म्हटलं आहे. तेजश्रीच्या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळाली असून चाहत्यांनी कमेन्ट्समध्ये हार्ट इमोजी शेअर केलेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : वो मेरे करीब है... नेमकं कोणाबद्दल बोलतेय तेजश्री प्रधान, फोटो व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल