TRENDING:

'बॅग घेऊन गेले अन् तिथेच राहिले', लग्नाआधी 2 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहत होती मराठी अभिनेत्री, नवऱ्याने अजय देवगणसोबत केलंय काम

Last Updated:
फेब्रुवारी २०२४ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली असली, तरी लग्नापूर्वी ते दोन वर्षे चक्क लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नुकत्याच एका मुलाखतीत या दोघांनी आपल्या प्रेमाचा आणि एकत्र राहण्याचा फिल्मी प्रवास उलगडला आहे.
advertisement
1/9
लग्नाआधी 2 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहत होतं मराठी कपल, सांगितला लग्नापर्यंतचा प्रवास
मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील सर्वात क्युट जोडी म्हणून ओळखले जाणारे तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके सध्या आपल्या एका खुलाशामुळे चर्चेत आहेत.
advertisement
2/9
फेब्रुवारी २०२४ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली असली, तरी लग्नापूर्वी ते दोन वर्षे चक्क लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नुकत्याच एका मुलाखतीत या दोघांनी आपल्या प्रेमाचा आणि एकत्र राहण्याचा फिल्मी प्रवास उलगडला आहे.
advertisement
3/9
तितीक्षा आणि सिद्धार्थची पहिली ओळख 'झी मराठी'वरील 'कन्यादान' मालिकेच्या सेटवर झाली होती. तेव्हा दोघेही सहाय्यक भूमिकांमध्ये होते. मात्र, खऱ्या अर्थाने त्यांच्यातली मैत्री घट्ट झाली ती 'तू अशी जवळी रहा' या मालिकेमुळे.
advertisement
4/9
या मालिकेत त्यांनी नायक-नायिका म्हणून एकत्र काम केलं आणि शूटिंगच्या गप्पांमध्ये कधी मनाचे तार जुळले, हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही. सिद्धार्थच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या काळात त्यांना एकमेकांबद्दलच्या प्रेमाची खरी जाणीव झाली.
advertisement
5/9
तितीक्षाने एकत्र राहायला जाण्याचा एक मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, "जेव्हा खुशबूच्या घरी तिचे सासू-सासरे येणार होते, तेव्हा मी काही दिवसांसाठी सिद्धार्थकडे राहायला जायचं ठरवलं. सुरुवातीला मी फक्त एक बॅग घेऊन गेले, मग दुसरी बॅग आली आणि हळूहळू मी तिथेच शिफ्ट झाले!" अशा प्रकारे कोणत्याही मोठ्या नियोजनाशिवाय ते दोन वर्षे एकत्र लिव्ह-इनमध्ये राहिले.
advertisement
6/9
विशेष म्हणजे, या दोघांच्याही घरी त्यांच्या या नात्याबद्दल आणि लिव्ह-इनमध्ये राहण्याबद्दल कोणाचाही आक्षेप नव्हता. दोघांच्याही पालकांना माहीत होतं की हे दोघेही समजूतदार आहेत आणि जे काही करतायत ते लग्नाच्या दृष्टीनेच करतायत.
advertisement
7/9
लिव्ह-इनमध्ये राहण्याचा फायदा त्यांना त्यांच्या स्वभावातील गुणदोषांची जाण होण्यासाठी झाला. सिद्धार्थ म्हणतो, "दोन वर्षे सोबत राहिल्यामुळे आम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वभाव आणि भांडण झाल्यावर कसं वागायचं, हे सगळं नीट समजलं होतं. आम्ही नाशिकला माझ्या घरी किंवा डोंबिवलीला तितीक्षाच्या घरी एकत्रच जायचो."
advertisement
8/9
जेव्हा त्यांना वाटलं की आता आपण लग्नासाठी तयार आहोत, तेव्हा त्यांनीच पुढाकार घेऊन घरच्यांना सांगितलं, "आता आमचं लग्न लावा!"
advertisement
9/9
त्यानंतर तारखा पाहिल्या, मुहूर्त शोधला आणि अगदी सोप्या पद्धतीने या जोडीने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नाचा बार उडवून दिला. लवकरच त्यांच्या लग्नाला दोन वर्षं पूर्ण होणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बॅग घेऊन गेले अन् तिथेच राहिले', लग्नाआधी 2 वर्ष लिव्ह-इनमध्ये राहत होती मराठी अभिनेत्री, नवऱ्याने अजय देवगणसोबत केलंय काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल