Anaya Bangar in Rise And Fall : लिंग बदललेल्या अनाया बांगरला व्हायचंय आई, म्हणते 'माझ्याकडे फक्त दोनच ऑप्शन'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Anaya Bangar : माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची कन्या अनाया बांगर सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिॲलिटी शोमध्ये दिसत असून तिने एका एपिसोडमध्ये आई होण्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/8

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक संजय बांगर यांची कन्या अनाया बांगर सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे.
advertisement
2/8
जन्माने मुलगा असलेल्या अनायाने आपलं लिंग परिवर्तन करून घेतलं आहे आणि ती आता एक ट्रान्सजेंडर महिला आहे.
advertisement
3/8
नुकतंच तिने एका एपिसोडमध्ये आई होण्याच्या तिच्या प्लॅनबद्दल एक खूप मोठा खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.
advertisement
4/8
अनाया बांगरने शोमध्ये आरुष भोलासोबत बोलताना तिच्या लिंग परिवर्तनाच्या प्रवासाबद्दल आणि भविष्यात आई होण्याच्या तिच्या स्वप्नाबद्दल सांगितलं.
advertisement
5/8
ती म्हणाली की, ‘माझ्याकडे आई होण्यासाठी दोनच पर्याय आहेत, पहिला म्हणजे बाळ दत्तक घेणं आणि दुसरा म्हणजे हार्मोनल उपचार सुरू करण्यापूर्वी माझे स्पर्म फ्रीज करणं.’
advertisement
6/8
अनायाने सांगितलं, “मी सरोगसीच्या मदतीने आई होऊ शकते. मी लिंग परिवर्तन करण्यापूर्वीच माझे स्पर्म जमा करून ठेवले होते. कारण, मी गरोदर राहू शकत नाही.”
advertisement
7/8
अनाया बांगर ही संजय बांगरची कन्या आहे. तिचं जन्मावेळीचं नाव आर्यन बांगर होतं. वयाच्या २३ व्या वर्षी, २०२४ मध्ये तिने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू केली आणि ती ‘आर्यन’वरून ‘अनाया’ झाली.
advertisement
8/8
ती आधी क्रिकेटपटू होती आणि क्लब क्रिकेटमध्येही खेळली आहे. तिने भारतीय महिला क्रिकेट संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशीही चर्चा केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Anaya Bangar in Rise And Fall : लिंग बदललेल्या अनाया बांगरला व्हायचंय आई, म्हणते 'माझ्याकडे फक्त दोनच ऑप्शन'