Joint Pain Home Remedies : गुडघे दुखीमुळे त्रस्त आहात? वापरा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
गुडघे दुखीने अनेक लोक त्रस्त असतात. गुडघे दुखीची विविध कारण असली तरी बऱ्याचदा शरीरात युरिक ऍसिड वाढल्यामुळे देखील गुडघे दुखीचा त्रास जाणवतो. तेव्हा यावर 5 घरगुती आयुर्वेदिक उपाय परिणामकारक ठरू शकतात जे शरीरातील वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी देखील फायदेशीर असतात.
advertisement
1/5

त्रिफळा : हेल्थलाइननुसार त्रिफळा सेवनाने सांधेदुखीपासून आराम मिळतो. त्रिफळामध्ये बहेडा, आवळा आणि हरड या तीन प्रकारच्या औषधी वनस्पती असतात. आयुर्वेदानुसार हे तिघे शरीरातील तिन्ही दोष दूर करतात. त्रिफळा हे दाहक विरोधी आहे, जे सांध्यातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
advertisement
2/5
कडुनिंब : कडुनिंब हे अँटी बॅक्टेरियल असण्यासोबतच अँटी इंफ्लामेटरी देखील आहे. आयुर्वेदात सांधेदुखीवरील कडुनिंबाची पाने हा रामबाण इलाज असल्याचे सांगितले जाते. कडुलिंबाची पाने कुस्करून दुखणाऱ्या सांध्यांवर लावल्यास वेदनेवर लवकर आराम मिळतो. कडुलिंब सांध्यातील जळजळ कमी करते आणि वेदना दूर करते.
advertisement
3/5
कारल : कारल्याला हे अधिकतर डायबिटीजवर प्रभावी आहे. परंतु कारलं हे संधिवाताच्या दुखण्यातही फायदेशीर ठरत. कारल्यामुळे शरीरातील वातदोष कमी होतो. म्हणूनच आयुर्वेदात सांधेदुखीच्या बाबतीत कारल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारल्यामुळे शरीरातील यूरिक अॅसिड कमी होते.
advertisement
4/5
कोरफड : कोरफड मध्ये भरपूर प्रमाणात अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत. कोरफडीचा रस रक्तातील यूरिक ऍसिडचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करतो तसेच यामुळे सांधेदुखी कमी होते.
advertisement
5/5
हळद : प्रत्येक घरात जेवण बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळद ही आयुर्वेदिक असून अनेक आजारांवर प्रभावी ठरते. हळद ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती असून ज्यामध्ये कर्क्यूमिन संयुग आढळते. हे कर्क्यूमिन रक्तातील यूरिक ऍसिड काढून टाकते. पबमेड सेंट्रल जर्नलनुसार, हळद सांधेदुखी किंवा संधिवातची लक्षणे कमी करते. दुधात मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Joint Pain Home Remedies : गुडघे दुखीमुळे त्रस्त आहात? वापरा हे 5 घरगुती उपाय, मिळेल आराम