हिवाळ्यात नक्की खा ही 6 फळं; सर्दी-खोकल्यापासून राहाल दूर, रोगप्रतिकारशक्तीही झपाट्यानं वाढेल
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
हिवाळा असो किंवा उन्हाळा, माणसाने नेहमी फळं खावीत. यातून मानवाला अनेक फायदे होतात. पण अशी काही फळं आहेत जी थंडीत खाणं खूप फायदेशीर मानलं जातं. (रिपोर्ट - आशुतोष तिवारी/रीवा)
advertisement
1/6

निरोगी जीवन जगण्यासाठी थंडीमध्ये संत्र्याचं सेवन करणं खूप फायदेशीर मानलं जातं. डायटीशियन निशा टंडन सांगतात की, हिवाळ्यात संत्री खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. यामुळे हिवाळ्यात इन्फेक्शन, सर्दी आणि विषाणूजन्य आजारांचा धोका कमी होतो.
advertisement
2/6
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात या फळाचा आहारात समावेश करणं खूप फायदेशीर ठरेल. रताळे खाल्ल्याने तुम्ही हृदयाच्या अनेक आजारांपासून स्वतःला दूर ठेवू शकता. रताळ्यामुळे लोहाची कमतरता देखील दूर होते. यामुळे पचनक्रियाही मजबूत होते.
advertisement
3/6
पेरू खाल्ल्याने सर्दी बरी होते असा अनेकांचा समज आहे. तर पेरू हे व्हिटॅमिन सी, ए, ई, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅंगनीज आणि इतर अनेक खनिजांचे भांडार आहे. जर तुम्ही रोज एक पेरू खात असाल, तर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. असं केल्याने तुम्ही तुमच्या शरीराला सर्दी आणि खोकल्यापासून वाचवू शकता.
advertisement
4/6
डाळिंब हे रक्त पातळ करण्यासाठी ओळखलं जातं, रक्ताची कमतरता देखील फळाद्वारे भरून काढली जाते. याच्या सेवनाने रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो. यामुळेच हे फळ स्ट्रोकचा धोका कमी करतं. हिवाळ्याच्या काळात लोक आजारी पडतात. अशा परिस्थितीत रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी या फळाचा आहारात समावेश करावा.
advertisement
5/6
डायबिटीजच्या रुग्णांसाठी नाशपती खूप फायदेशीर आहे. या फळामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. यामुळेच पोट जास्त काळ भरलेलं राहतं. त्यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही हे फळ खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे.
advertisement
6/6
थंडीच्या दिवसात मोसंबीही खूप फायदेशीर असते. थंडीच्या दिवसात हे फळ शरीराला इन्फेक्शनशी लढण्याची ताकद देतं. मोसंबी फळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. मात्र हे फळ थंड असल्याने ते उन्हात बसून खाण्याचा प्रयत्न करावा. असं केल्यानं हिवाळ्यातही हे फळ खाल्ल्याने इन्फेक्शन टाळता येतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
हिवाळ्यात नक्की खा ही 6 फळं; सर्दी-खोकल्यापासून राहाल दूर, रोगप्रतिकारशक्तीही झपाट्यानं वाढेल