TRENDING:

Foods to Avoid at night: वजन कमी करायचं आहे? हेल्दी, फिट आणि फ्रेश राहायचं आहे ? रात्री टाळा ‘हे’ पदार्थ

Last Updated:
7 Foods to avoid at night in Marathi: वाढत्या वजनाने अनेक जण त्रस्त झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेक करूनही त्यांना यश येत नाहीये. वाढत्या वजनासाठी व्यायामाचा अभाव, जंक फूड, मानसिक ताणतणाव हे जितके कारणीभूत आहेत तितकीच कारणीभूत आहे रात्रीची शांत झोप. रात्रीचं जेवण झाल्यानंतर जेव्हा तुमची पचनक्रिया सुरळीत होते तेव्हा तुम्हाला शांत झोप लागू शकते. म्हणूनच रात्री झोपण्याच्या 3 तास आधी जेवण करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. तुम्हाला जेवणापूर्वी 3 तास जेवणं शक्य नसेल खाली दिलेले पदार्थ रात्री खाणं टाळा. ज्यामुळे तुमचं पचन सुलभ होऊन तुम्हाला रात्री शांत झोप येऊन, वजन कमी व्हायला मदत होईल आणि आपसूचक तुमचं आरोग्य चांगलं राहील.
advertisement
1/7
Foods to Avoid at night: वजन कमी करायचं आहे? रात्री टाळा ‘हे’ पदार्थ
अनेक जण रात्री जेवण करणं टाळून फास्ट फूड खाणं पसंत करतात. मात्र रात्री फास्ट फूड खाणं हे आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेसाठी धोक्याचं आहे. फास्ट फूडमुळे आपल्या शरीरातली कोलेस्टेरॉलची पातळी वाढून मधुमेहाचा धोका वाढू शकतो. याशिवाय फास्ट फूड खाल्ल्याने ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो.
advertisement
2/7
अनेकांना रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ खाण्यची सवय असते. जेवणात किंवा जेवणानंतर गोड पदार्थ खाणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे रक्तातली साखर वाढून डायबिटीसचा धोका वाढू शकतो. याशिवाय रात्री पचन व्यवस्थित न झाल्याने आणि गोड पदार्थातल्या कॅलरीजमुळे वजन वाढण्याची देखील भीती असते.
advertisement
3/7
तळलेलं अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तळलेलं अन्न खाल्ल्याने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. याशिवाय ॲसिडिटीचाही त्रास होऊन पचनाचे विकार आणि पोददुखीच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
advertisement
4/7
रात्री उशिरा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तिखट पदार्थांमुळे आतड्यांची जळजळ, पित्ताचा त्रास आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अस्वस्थपणामुळे तुम्ही रात्री झोपून शकणार नाही.
advertisement
5/7
कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन असते. ज्यामुळे झोप येत नाही. त्यामुळे रात्री 8 नंतर कॅफिनयुक्त पदार्थांचं सेवन टाळावं, म्हणजे शांत झोप येऊ शकेल. तुम्हाला जास्त प्रमाणात कॉफी पिण्याची सवय असेल तर तुम्हाला ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो.
advertisement
6/7
रात्री उशिरा जेवणानंतर किंवा जेवणापूर्वी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने टाळावं, यामुळे आम्लपित्त, पोटफुगी इत्यादी समस्या उद्भवू शकतात. मात्र तुम्हाला रात्री दूध पिण्याची सवय असेल तर ते दूध फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून प्यायल्याने त्रास कमी होऊ शकतो.
advertisement
7/7
अनेकांना रात्री ड्रिंक्स करण्याची सवय असते. ड्रिंक्स करताना ते रात्री मसालेदार, तेलकट पदार्थ खातात. त्यामुळे ॲसिडिटीचाही त्रास होण्याची भीती असते. याशिवाय अल्कोहोलमुळे आपल्या शरीरात डिहायड्रेशन होऊन झोपेची गुणवत्ता बिघडू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Foods to Avoid at night: वजन कमी करायचं आहे? हेल्दी, फिट आणि फ्रेश राहायचं आहे ? रात्री टाळा ‘हे’ पदार्थ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल