तरुणाची रोपवाटिका व्यवसायात झेप, काही वर्षातच उलाढाल पोहोचली अडीच कोटींपर्यंत!
- Published by:Pooja Jagtap
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
कृषी शिक्षणाचा पाया आणि शेतीची आवड यांचा योग्य संगम घडला तर यश कसं मिळतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उमरी (मेघे) येथील वैभव चंद्रकांत उघडे. छोट्या स्तरावर सुरू केलेली रोपवाटिका आज तब्बल 18 एकरांवर विस्तारली असून वार्षिक उलाढाल अडीच कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
1/7

कृषी शिक्षणाचा पाया आणि शेतीची आवड यांचा योग्य संगम घडला तर यश कसं मिळतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे उमरी (मेघे) येथील वैभव चंद्रकांत उघडे. छोट्या स्तरावर सुरू केलेली रोपवाटिका आज तब्बल 18 एकरांवर विस्तारली असून वार्षिक उलाढाल अडीच कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वर्ध्यात वास्तव्य आणि उमरी येथे साडेपाच एकर शेती इथूनच वैभव उघडे यांचा शेतीशी असलेला जवळचा परिचय सुरू झाला.
advertisement
2/7
वैभव उघडे यांनी दहावीनंतर कृषी पदविका आणि पुढे बी.एस्सी. ॲग्री पूर्ण केल्यानंतर नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विविध पशुपालन प्रयोग, गुलाबशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी, आर्थिक ताळेबंद समजून घेतल्यानंतर रोपवाटिका हीच दिशा निवडली. 2007-8 मध्ये स्वतःच्या शेतात पिकवण्यासाठी पपई रोपे तयार करण्याचा पहिला प्रयत्न केला.
advertisement
3/7
दर्जेदार रोपांमुळे आसपासच्या शेतकऱ्यांनी मोठी मागणी सुरू केली. इथूनच रोपवाटिका व्यवसायाचा पाया रचला गेला आणि ‘मातोश्री नर्सरी’ची सुरुवात झाली. वाढत्या मागणीमुळे 25 लाखांचे बँक कर्ज घेऊन व्यवसायाचा विस्तार सुरू झाला. हळूहळू शेतालगतची शेती खरेदी करत करत आज 18 एकरांवर नर्सरी उभारली आहे. भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, शोभिवंत झाडे अशी विविधता वाढत गेल्याने रोपवाटिकेला स्थिर ग्राहक वर्ग मिळू लागला.
advertisement
4/7
नर्सरीसाठी 6 पॉलिहाऊस, शेडनेट, ड्रिप-तुषार सिंचन, पाणी साठवण व पुनर्भरणाची आधुनिक व्यवस्था उभारण्यात आली आहे. पॉलिहाऊसवर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून विहीर–बोअरवेलमध्ये परत भरण्याची पद्धत त्यांनी विकसित केली आहे. 2012 मध्ये आत्मा योजनेसाठी सर्वात कमी दराने निविदा मिळवली आणि एकाच वेळी 11 लाख रोपे जिल्ह्यात पुरवली.
advertisement
5/7
त्यानंतर वर्धा, नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांतील किरकोळ रोपवाटिकांकडून त्यांच्या रोपांना मोठी मागणी वाढली. वांगी, टोमॅटो, मिरची, फुलकोबी, झेंडू, पपई, केळी यांसह फळझाडांमध्ये आंबा, मोसंबी, चिकू, पेरू, अंजीर, सिताफळ अशी रोपे तयार होतात. हंगामात 50 लाखांपेक्षा जास्त रोपे विक्री होतात.
advertisement
6/7
शोभिवंत वनस्पतींमध्ये 175 ते 200 प्रकार पाम, स्नेक, जरबेरा, विविध गुलाब यांनाही मोठी मागणी आहे. घरगुती बागेसाठी 10 ते 500 रुपये दरातील आकर्षक रोपे नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर बाजारात मोठ्या प्रमाणात पुरवली जातात. शोभिवंत वनस्पती आणि फळझाडांमुळे नर्सरीची उलाढाल लक्षणीय वाढली आहे.
advertisement
7/7
मातोश्री नर्सरीमध्ये आज 55 ते 60 मजूर कायमस्वरूपी काम करतात. विशेष म्हणजे महिला मजुरांचे प्रमाण जास्त असून दर आठवड्याला वेतन देण्याची पद्धत आहे. नर्सरीतून मिळणारा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे रोपे, फळ–फुलझाडे, शोभिवंत रोपे, कृषी मार्गदर्शन, कृषी केंद्र सेवा या सर्व माध्यमातून वार्षिक उलाढाल 2.5 कोटी रुपये इतकी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तरुणाची रोपवाटिका व्यवसायात झेप, काही वर्षातच उलाढाल पोहोचली अडीच कोटींपर्यंत!