TRENDING:

Parent Child Bond : नकळत मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष होत नाहीये? असे मजबूत करा मुलांसोबतचे नाते

Last Updated:
Tips For Building Strong Parent Child Relationship : प्रत्येक पालकाला आपल्या मुलांसोबत एक निरोगी नातेसंबंध निर्माण करायचे असते. पण अनेकदा पिढीतील अंतरामुळे पालक आणि मुलांमध्ये गैरसमज निर्माण होतात. अशा परिस्थितीत, पालकांचे आपल्या मुलांसोबतचे नाते सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स येथे दिल्या आहेत.
advertisement
1/7
नकळत मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष होत नाहीये? असे मजबूत करा मुलांसोबतचे नाते
कधी कधी पालक आपल्या मुलांना त्यांच्या चुकांसाठी दोष देतात, त्यांना ओरडतात, मारतात किंवा अपशब्द वापरतात. यामुळे पालक आणि मुलांमधील दरी आणखी वाढू शकते. तुमचे नाते जपण्यासाटःई आणि आणखी घट्ट बनवण्यासाठी काही टिप्स पाहूया.
advertisement
2/7
मुलांना ओरडणे टाळा : जेव्हा मुलं ऐकत नाहीत, तेव्हा काही पालक त्यांना ओरडतात, मारतात किंवा धमक्या देतात. असे केल्याने तुमचं मूल तुमच्यासोबत आपलं मन मोकळं करणं बंद करू शकतं किंवा तुमचा आदर करणे सोडू शकतं. शक्यतो मुलांना उगाच ओरडणे किंवा मारणे टाळा.
advertisement
3/7
मुलांच्या भावना समजून घ्या : अनेकदा पालक आपल्या मुलांकडून फक्त आपल्याच मताचा स्वीकार करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मुलांच्या मनात तुमच्याबद्दल नाराजी निर्माण होऊ शकते. त्यामुळे, प्रत्येक वेळी तुमचं मत मुलांवर लादणे टाळा.
advertisement
4/7
वाईट सवयींबद्दल सतत बोलू नका : प्रत्येक मूल परिपूर्ण नसते. बहुतेक पालक आपल्या मुलांमधील चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या वाईट सवयींबद्दल सतत बोलून त्यांना टोमणे मारतात. यामुळे तुमच्या मुलांच्या भावना दुखावतील आणि त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. त्यामुळे नेहमी त्यांच्या चुका काढणे टाळा.
advertisement
5/7
अपशब्द वापरू नका : रागाच्या भरात काही पालक आपल्या मुलांना अपशब्द बोलतात. यामुळे मुलांच्या भावना दुखावतात आणि तुमच्या दोघांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुलांना ओरडतानाही वाईट किंवा अपमानास्पद भाषा वापरणे टाळा.
advertisement
6/7
वेळ आणि प्रेम द्या : आजच्या धावपळीच्या जीवनात पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे मुलांच्या मनात 'तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाही' असे विचार येऊ शकतात. म्हणून, आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना भरपूर प्रेम द्या.
advertisement
7/7
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Parent Child Bond : नकळत मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष होत नाहीये? असे मजबूत करा मुलांसोबतचे नाते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल