भविष्यातील सगळ्यात मोठं आरोग्य संकट! नव्या वर्षाच्या एक महिनाआधी बड्या डॉक्टरने केलं Alert
- Published by:Priya Lad
Last Updated:
Antibiotic Resistance : जुनं वर्ष संपायला आलं असताना नव्या वर्षातील भविष्याचीही चिंता लागलेली आहे. नवं वर्ष सुरू होण्याधी एका बड्या डॉक्टरने मोठ्या धोक्याबाबत सावध केलं आहे. भविष्यातील सगळ्यात मोठ्या आरोग्य संकटाबाबत अलर्ट केलं आहे.
advertisement
1/5

2025 वर्षांतील नोव्हेंबर महिना संपतच आला आहे, आता उरला फक्त शेवटचा एक डिसेंबर महिना. नंतर 2026 वर्ष उजाडेल. नवीन वर्षाबाबत अनेक जण स्वप्न रंगवत असताना या वर्षात नेमकं काय वाढून ठेवलं आहे, अशी भविष्याची चिंताही आहे. याचदरम्यान हे नवं वर्ष सुरू होण्याधी एका बड्या डॉक्टरने मोठ्या धोक्याबाबत सावध केलं आहे. भविष्यातील सगळ्यात मोठ्या आरोग्य संकटाबाबत अलर्ट केलं आहे.
advertisement
2/5
डॉ. बी. एल. बैरवा राजस्थानातील कन्सलटंट लेप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन. ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्डही केला. त्यांनी येणाऱ्या काळातील सर्वात मोठ्या संकटाबाबत सावध केलं आहे. ज्याचे उपचार जवळपास अशक्यच आहेत. आता हे वाचूनच तुम्हाला भीती वाटली असेल. हे असं कोणतं संकट आहे, काय आहे? असे कित्येक प्रश्न तुम्हाला पडले असतील.
advertisement
3/5
हे संकट म्हणजे अँटिबायोटिक्स रेजिस्टंट. अँटिबायोटिक्स बॅक्टेरियांना मारणारं औषध आणि जेव्हा बॅक्टेरियांवर या औषधांचाही परिणाम होत नाही त्याला अँटिबायोटिक्स रेजिस्टंट म्हणतात. बॅक्टेरिया औषध ओळखून स्वतःमध्ये बदल करतात त्यामुळे नंतर त्या औषधाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. देशातील आयसीयूमध्ये आधीच 40-60 टक्के प्रकरण अँटिबायोटिक्स रेजिस्टंटची आहेत.
advertisement
4/5
रुग्णाला बॅक्टेरिया इन्फेक्शन असतात अँटिबायोटिक्स रेजिस्टंटवर उपचार करणं जवळपास अशक्यच आहे. रेजिस्टंट बॅक्टेरिया शरीरावर हल्ला करत राहतात. मग कितीही स्ट्राँग, शेवटच्या लाइनमधील ट्रगही काम करत नाही. बॅक्टेरियाच्या विषामुळे 24 तासांत मृत्यू होऊ शकतो. योग्य औषध ओळखणारा रिपोर्ट येण्यात 5-6 दिवस लागू शकता. त्या कालावधीत कित्येक रुग्णांचा मृत्यू होतो.
advertisement
5/5
गरजेशिवाय अँटिबायोटिक्स घेणं, कमी डोस किंवा चुकीचे डोस, 7 दिवसांऐवजी 2-3 दिवसांत औषध बंद करणं, सर्दी-खोकल्यासारख्या व्हायरसमुळे होणाऱ्या आजारांवर अँटिबायोटिक्स घेणं ही अँटिबायोटिक्स रेजिस्टंटची कारणं आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
भविष्यातील सगळ्यात मोठं आरोग्य संकट! नव्या वर्षाच्या एक महिनाआधी बड्या डॉक्टरने केलं Alert