Diabetes : डायबेटिज असल्यास उसाचा रस प्यावा की नाही?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Diabetes and sugarcane juice : उन्हाळ्यात उसाचा रस आरोग्य आणि शरीरासाठी चांगला. पण तो गोड असतो त्यामुले मधुमेहींनी उसाचा रस प्यावा की नाही? यावर डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्या.
advertisement
1/5

उन्हाळा म्हटलं की उसाचा रस आलाच. उसाचा रस शरीराला थंडावा देण्यास मदत करतो. पण हा रस गोड असतो. त्यामुळे तो डायबेटिज रुग्णांनी प्यावा की नाही असा प्रश्न पडतो. कारण उसाचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची भीती असते.
advertisement
2/5
मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्यापिण्यात थोडासाही गोंधळ झाला तरी रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अशा परिस्थितीत, मधुमेहात उसाचा रस किती आरोग्यदायी आहे आणि किती नाही हे जाणून घ्या.
advertisement
3/5
उसाच्या रसाबद्दल डॉ. प्रियंका सहरावत म्हणतात की, उसाचा रस शरीराला हायड्रेशन देतं. शरीराला खनिजे पुरवतं. त्यात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे ते एक चांगलं एनर्जी ड्रिंक म्हणून देखील काम करतं.
advertisement
4/5
पण उसाच्या रसाचा ग्लायसेमिक लोड जास्त असतो. उच्च ग्लायसेमिक भार म्हणजेच 20 पेक्षा जास्त ग्लायसेमिक भार शरीरात साखरेची पातळी दीर्घकाळ उच्च ठेवतो. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी उसाचा रस पिणं टाळावं.
advertisement
5/5
मधुमेही रुग्णांना उसाचा रस प्यायचा असेल तर त्यांनी तो मर्यादित प्रमाणात प्यावा. दररोज उसाचा रस पिणं टाळा. डॉ. प्रियंका सेहरावत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.