TRENDING:

Coconut oil vs Mustard oil : नारळ तेल की राईचं तेल कोणतं आहे केसांसाठी बेस्ट? आत्ताच दूर करा कन्फ्यूजन

Last Updated:
केसांच्या मसाजमुळे डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते आणि ताण कमी होतो. मात्र, नारळ आणि मोहरी या दोन्ही तेलांचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत
advertisement
1/8
नारळ तेल की राईचं तेल कोणतं आहे केसांसाठी बेस्ट? आत्ताच दूर करा कन्फ्यूजन
आपल्या शरीराला जशी अन्नाची गरज असते, तशीच आपल्या केसांना पोषणाची गरज असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात, वाढतं प्रदूषण आणि ताणतणावामुळे केसांच्या समस्या घरोघरी पाहायला मिळतात. कधी केस गळतात, कधी कोरडे पडतात तर कधी कोंड्याचा त्रास सतावतो. यावर उपाय म्हणून आपण महागडे शॅम्पू किंवा सिरम वापरतो, पण आपल्या आजी-पणजीच्या काळातील सर्वात प्रभावी उपाय आपण विसरतोय, तो म्हणजे 'तेलाने मसाज'.
advertisement
2/8
केसांना तेल लावणं हे केवळ एक काम नसून ते केसांना दिलेलं 'भोजन' आहे. पण जेव्हा तेल निवडण्याची वेळ येते, तेव्हा आपल्यासमोर दोन मोठे पर्याय असतात खोबरेल तेल (Coconut Oil) की मोहरीचं तेल (Mustard Oil)? तुमच्या केसांच्या प्रकारानुसार नक्की कोणतं तेल 'बेस्ट' आहे, हे जाणून घेऊया.
advertisement
3/8
केसांच्या मसाजमुळे डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते आणि ताण कमी होतो. मात्र, नारळ आणि मोहरी या दोन्ही तेलांचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहेत
advertisement
4/8
1. खोबरेल तेल (Coconut Oil): केसांचे नैसर्गिक संरक्षकभारतात पिढ्यानपिढ्या खोबरेल तेलाचा वापर केला जात आहे. हे तेल केसांच्या मुळांपर्यंत जाऊन त्यांना आतून पोषण देते. यात लॉरिक ॲसिड आणि फॅटी ॲसिड्स भरपूर असतात, जे केसांमधील प्रोटीनची कमतरता भरून काढतात. जर तुमचे केस कोरडे आणि डॅमेज झाले असतील, तर खोबरेल तेल तुमच्यासाठी उत्तम आहे. हे केसांना ओलावा (Moisture) देते आणि त्यांना चमकदार बनवते.यात अँटी-फंगल गुणधर्म असल्याने टाळूवरील खाज किंवा इन्फेक्शन कमी करण्यास मदत होते.
advertisement
5/8
2. मोहरीचे तेल (Mustard Oil): वाढीसाठी पॉवरहाऊसमोहरीचं तेल हे उष्ण प्रकृतीचं असतं आणि ते केसांच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं. यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, झिंक आणि मॅग्नेशियम असते. हे तेल डोक्याला लावल्याने रक्ताचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे केसांची मुळे सक्रिय होतात आणि केसांची वाढ वेगाने होते. मोहरीच्या तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म कोंड्याची समस्या मुळापासून नष्ट करण्यास मदत करतात.
advertisement
6/8
मोहरीचे तेल कसे लावावे?1. थोडे मोहरीचे तेल कोमट करा.2. 10-15 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.3. किमान एक तास ठेवा आणि नंतर शॅम्पूने धुवा.अधिक चांगल्या रिझल्टसाठी यात कढीपत्ता गरम करून वापरू शकता.
advertisement
7/8
खोबरेल तेल कसे लावावे?1. कोमट खोबरेल तेलाने केसांना मसाज करा.2. केस धुण्यापूर्वी किमान एक तास हे तेल केसात राहू द्या.विशेष टीप: जर केस खूप जास्त गळत असतील, तर खोबरेल तेलात एक चमचा एरंडेल तेल (Castor Oil) मिसळा.
advertisement
8/8
केसांची वाढ आणि मजबुतीसाठी मोहरीचे तेल वरचढ ठरते, तर केसांचा पोत आणि आरोग्य टिकवण्यासाठी खोबरेल तेल उत्तम आहे. तुमच्या केसांच्या गरजेनुसार तुम्ही यातील योग्य तेलाची निवड करू शकता. आठवड्यातून किमान एकदा तरी तेलाने मसाज करण्याची सवय लावून घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Coconut oil vs Mustard oil : नारळ तेल की राईचं तेल कोणतं आहे केसांसाठी बेस्ट? आत्ताच दूर करा कन्फ्यूजन
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल