TRENDING:

Constipation Remedy : दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे आतडे होऊ शकतात ब्लॉक; हे 2 पदार्थ करतील त्रासातून सुटका..

Last Updated:
आजकाल बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. यातील काही लोक दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचे बळी ठरतात. जुनाट बद्धकोष्ठता, म्हणजे हा आजार शरीरात कायमचा राहतो. बद्धकोष्ठतेमुळे रुग्ण शारिरीकच आणि मानसिकदृष्ट्याही त्रस्त राहतात. बद्धकोष्ठतेवर वेळीच उपचार केले नाही तर सामान्य बद्धकोष्ठता दीर्घकालीन बद्धकोष्ठतेत बदलते. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे गुद्द्वाराची त्वचा फाटू शकते आणि एनल फिशर होऊ शकते. तीव्र बद्धकोष्ठता तीव्र झाल्यास आतडे ब्लॉक होऊ शकतात किंवा त्याच्या कामामध्ये अडथळा येऊ शकतो. या सर्व कारणांमुळे बद्धकोष्ठतेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
advertisement
1/5
दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे आतडेही होऊ शकतात ब्लॉक; हे 2 पदार्थ सोडवतील त्रास..
बद्धकोष्ठतेची कारणे : सर गंगाराम हॉस्पिटल, इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड पॅन्क्रियाटिक बिलीरी सायन्सेस येथील सल्लागार, डॉ. श्रीहरी अनिखिंडी यांनी सांगितले की, बद्धकोष्ठतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. पाण्याशिवाय आहारात योग्य प्रमाणात फायबर असल्यास बद्धकोष्ठतेचा धोका कमी असतो. अशाप्रकारे, फायबर आणि पाण्याचे प्रमाण कमी असल्यास मलमधील सामग्री कठोर होते आणि हे बद्धकोष्ठतेचे कारण बनते.
advertisement
2/5
डॉ. श्रीहरी यांनी सांगितले की, आजकाल आपल्या खाण्याच्या सवयी खूप चुकीच्या झाल्या आहेत. सॅलड कमी खाणे, फळे कमी खाणे, प्रक्रिया केलेले अन्न जास्त खाणे, पाणी कमी पिणे या सर्व वाईट सवयी बद्धकोष्ठता वाढवतात.
advertisement
3/5
हार्वर्ड मेडिकल स्कूलने अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचा हवाला देत म्हटले आहे की दोन नैसर्गिक गोष्टी बद्धकोष्ठता दूर करू शकतात. संशोधनात असे आढळून आले किवी आणि इसबगोल या दोन अशा गोष्टी आहेत, ज्या बद्धकोष्ठतेमध्ये वैद्यकीयदृष्ट्या खूप फायदेशीर आहेत. डॉक्टरांनी असेही सांगितले की जर तुम्हाला सामान्य बद्धकोष्ठता असेल तर या दोन गोष्टींचे सेवन करा.
advertisement
4/5
याशिवाय, जर बद्धकोष्ठतेचा त्रास वाढलेले असेल, त्रास जुना झाला किंवा तुम्ही त्यासाठी औषधं घेत असाल तरीही तुम्ही किवी आणि इसबगोल घेऊ शकता. म्हणजेच जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही इतर जे काही उपाय करत असाल आणि त्यातून आराम मिळत असेल तर करा पण त्यासोबत किवी आणि इसबगोलचे सेवन करा. यामुळे बद्धकोष्ठतेचा जुना त्रासही बरा होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
5/5
बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवण्याचा निश्चित उपाय : डॉ. अनिखिंडी म्हणतात की, बद्धकोष्ठता तुम्हाला त्रास देत असेल तर सर्वात आधी जास्त पाणी घ्या आणि तुमच्या आहारात जास्त फायबरयुक्त अन्नाचा समावेश करा. यासाठी शेंगायुक्त भाज्या, खजूर, फळे, अक्रोड, बदाम इत्यादींचे सेवन करा. या सर्वांनीही बद्धकोष्ठतेपासून आराम मिळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरुवातीला डॉक्टर लक्सेटीव्ह मेडिसिनने त्रास सोडवण्याचा प्रयत्न करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Constipation Remedy : दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे आतडे होऊ शकतात ब्लॉक; हे 2 पदार्थ करतील त्रासातून सुटका..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल