Dengue Tips : डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यात? 'हे' पदार्थ खा, वेगाने होईल रिकव्हरी
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
डेंग्यू आणि मलेरिया हे डासांमुळे पसरणारे साथीचे आजार आहेत. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते अशा लोकांना याची लागण लवकर होते. सध्या डेंग्यूची साथ सुरू आहे. डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्सची टीएलसी संख्या कमी झाल्यावर रुग्णाची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. त्यामुळे डिहायड्रेशनही होतं. अशा स्थितीत शरीरातील प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी काही घरगुती पदार्थ उपयुक्त ठरतात. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काय खावं? जाणून घ्या. या संदर्भात 'एबीपी लाइव्ह'ने वृत्त दिलंय.
advertisement
1/8

पपईच्या पानांचा रस : पपईच्या पानांमध्ये अॅसिटोजेनिन नावाचं एक युनिक फायटोकेमिकल असतं, जे डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढवू शकतं. या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटिनसारखी अनेक नैसर्गिक संयुगंदेखील आढळतात, जी जळजळ कमी करतात आणि अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात.
advertisement
2/8
मनुका : मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. अॅनिमियासारख्या आजारात हे खूप फायदेशीर आहे. डेंग्यूमध्येही हे खूप प्रभावी आहे. मूठभर मनुके रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी डेंग्यूच्या रुग्णांना द्या. याचे सेवन केल्याने शरीरातील प्लेटलेट्सची घटती संख्या वाढू लागते.
advertisement
3/8
संत्र, आवळा, लिंबासारखी आंबट फळं : डेंग्यूच्या रुग्णांना व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ देणं फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन सी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. डेंग्यूच्या रुग्णांना संत्र, आवळा, लिंबू आणि ढोबळी मिरची द्यावी. ही फळं आणि भाज्या खाल्ल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढू शकते.
advertisement
4/8
डाळिंब : डेंग्यूच्या रुग्णांसाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे. यामध्ये आयर्नसारखी मिनरल्स व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे न्युट्रिएंट्स आढळतात. डेंग्यूच्या रुग्णाला दररोज डाळिंब दिल्यास त्याच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढू शकते.
advertisement
5/8
किवी : डेंग्यूच्या रुग्णांसाठी किवी फळ खाणं हा रामबाण उपाय आहे. या फळामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. दोन्ही पोषकतत्त्व शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढवण्याचे काम करतात. डेंग्यूच्या रुग्णांना अनेकदा किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत होते.
advertisement
6/8
बीटरूट : बीटरूटमध्ये असलेली पोषकतत्त्वं प्लेटलेट्सना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्याचं काम करतात. बीटरूट सलाडच्या किंवा ज्युसच्या स्वरुपात सेवन करता येतं. डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासह त्याचे आणखी बरेच फायदे आहेत.
advertisement
7/8
पालक सूप किंवा भाजी : पालकामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतं. ज्याला प्लेटलेट्स बूस्टर म्हणतात. डेंग्यूच्या रुग्णांना पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. पालकामध्ये फोलेट देखील मुबलक प्रमाणात आढळतं, जे प्लेटलेट्सची संख्या आणि पेशींच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. पण पालक कच्चं खाणं टाळा तसंच त्याचा रसही पिऊ नका. पालक शिजवूनच खावा.
advertisement
8/8
मेथीचं पाणी : डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण झपाट्याने कमी होत असेल, तर त्यांना मेथीचं पाणी देता येतं. रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी भिजत टाका आणि सकाळी गाळून घ्या आणि थोडी गरम करून सेवन करा. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या वाढू शकते. मात्र, रुग्णाला ब्लड शुगरचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dengue Tips : डेंग्यूमुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्यात? 'हे' पदार्थ खा, वेगाने होईल रिकव्हरी