TRENDING:

Heart Attack : माणसांसारखा प्राण्यांनाही हार्ट अटॅक येतो का? त्यांनाही हृदयाच्या समस्या असतात का?

Last Updated:
Animal Heart Attack : मानव आणि प्राण्यांच्या शरीराच्या प्रणाली बऱ्याच प्रमाणात सारख्याच असतात. आपल्या आणि प्राण्यांच्या हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत यासारख्या बहुतेक गोष्टी सारख्याच प्रकारे कार्य करतात.
advertisement
1/5
माणसांसारखा प्राण्यांनाही हार्ट अटॅक येतो का? त्यांनाही हृदयाच्या समस्या असतात?
माणूस आणि प्राण्यांची शरीरसंस्था बरीच सारखी असते. आपलं आणि प्राण्यांचं हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत यासारख्या बहुतेक गोष्टी सारख्याच प्रकारे कार्य करतात.
advertisement
2/5
प्राणीदेखील आपल्यासारखेच आजारी पडतात. फरक एवढाच आहे की मानव बोलून त्यांच्या समस्या व्यक्त करू शकतो, तर प्राणी वेदनांमध्येही शांत राहतात. प्राण्यांची स्थिती बिघडत नाही तोपर्यंत त्यांच्या आजारांचे निदान होत नाही हे याचं सर्वात मोठं कारण आहे.
advertisement
3/5
हृदय हा प्रत्येक जीवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, मग तो माणूस असो किंवा प्राणी. ते संपूर्ण शरीरात रक्त पंप करतं आणि शरीराच्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवतं. जर हृदयाने काम करणं थांबवलं तर सजीव गंभीर स्थितीत देखील पोहोचू शकतो.
advertisement
4/5
प्राण्यांना अनेकदा लक्षणांशिवाय हृदयविकाराचा त्रास होतो आणि कधीकधी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पण त्याचं स्वरूप थोडं वेगळं असतं. माणसांमध्ये हृदयविकाराचा झटका अनेकदा कोरोनरी धमनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे येतो. प्राण्यांमध्येही अशीच समस्या येऊ शकते.
advertisement
5/5
कार्डिओमायोपॅथी, मायट्रल व्हॉल्व्ह रोग, उच्च रक्तदाब आणि जन्मापासूनच असलेले हृदयरोग प्राण्यांमध्ये सर्वात सामान्य आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Heart Attack : माणसांसारखा प्राण्यांनाही हार्ट अटॅक येतो का? त्यांनाही हृदयाच्या समस्या असतात का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल