धैर्य, वीरता, जबाबदारी अन् दु:खासाठी वेगवेगळा फेटा, रंगांनुसार आहेत यांचे अर्थ, पाहा photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
जेव्हा कधीही फेट्यांचा किंवा पगडीचा उल्लेख केला जातो, तेव्हा राजस्थानचे नाव पहिल्यांदा समोर येते. कारण याचा इतिहास राजस्थानची कुठे ना कुठे तरी जोडला गेला आहे. कारण याठिकाणी फेटा म्हणजे पगडी ही फक्त एक श्रृंगार किंवा शोभेची वस्तू नसून आत्मसन्मानाचाही विषय आहे. (मनमोहन सेजु, बाडमेर)
advertisement
1/4

राजस्थानमध्ये कोणत्याही व्यक्तीला, किंवा एखाद्या जाती, समुदायाताला त्यांच्या फेट्याचा रंग आणि त्याला बांधण्याच्या शैलीवरुन ओळखले जाते. बाडमेर सह मालानी परिसरात विविध रंगांचे फेट्यांची ओळख आहे. या फेट्यांच्या रंगांवरुन त्यांची परंपरा जुळलेली आहे.
advertisement
2/4
राजस्थानी लोक आपल्या डोक्यावर फेटे बांधून आपल्या राजसी संस्कृतीचे प्रदर्शन करतात. केसरी रंगाचा फेटा हा धैर्य आणि वीरतेची निशाणी आहे. इतिहासात युद्धादरम्यान, केसरी फेटा घालून वीर युद्धात उतरायचे. आता केसरी आणि पिवळा फेटा हा मंगलकार्यात बांधला जातो.
advertisement
3/4
लाल रंगाचा फेटा हा मारवाड परिसरातील पशुपालक समुदायाचे लोक बांधतात. रबारी समाजासाठी लाल रंगाचा फेटा हा समृद्धीचे प्रतिक मानला जातो. लाल रंगाचा फेटा बांधणाऱ्या व्यक्तींना मालधारी असेल म्हटले जाते.
advertisement
4/4
सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाचा फेटा जबाबदारी आणि न्यायाचे प्रतीक मानला जातो. घरात सर्व वृद्ध आणि प्रमुख व्यक्ती हा पांढरा फेटा बांधतात. तसेच तसेच दु:खद घटनेदरम्यान, पांढरा फेटा बांधला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
धैर्य, वीरता, जबाबदारी अन् दु:खासाठी वेगवेगळा फेटा, रंगांनुसार आहेत यांचे अर्थ, पाहा photos