Kitchen Tips : शिळं जेवण गरम करुन खाणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा, काहीही झालं तरी 'हा' पदार्थ दुसऱ्यांदा गरम करण्याची चूक स्वप्नात सुद्धा करु नका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एवढ नाही तर एक असा पदार्थ देखील आहे, जो पुन्हा कधीच गरम न करण्याचा इशारा डॉक्टर देतात. कारण दुसऱ्यांदा गरम केल्याने यामध्ये थेट विष तयार होतं.
advertisement
1/8

सध्याच्या धावपळीच्या जीवनामुळे अनेकांना दोन्ही वेळेचं ताजं जेवण बनवणं शक्य होत नाही. त्यामुळे लोक कधी सकाळी जेवण बनवलेलं जेवण रात्री खातात. तर काही लोक हे रात्री बनवलेलं जेवण सकाळी खातात.
advertisement
2/8
अशावेळी लोक फ्रीजमध्ये जेवण ठेवतात आणि ते पुन्हा गरम करुन खातात. पण तुम्हाला माहितीय का की शिळ अन्न खाल्याने आपल्या शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. ज्यामुळे डॉक्टर शिळं अन्न न खाण्याचा सल्ला देतात.
advertisement
3/8
एवढ नाही तर एक असा पदार्थ देखील आहे, जो पुन्हा कधीच गरम न करण्याचा इशारा डॉक्टर देतात. कारण दुसऱ्यांदा गरम केल्याने यामध्ये थेट विष तयार होतं. हा पदार्थ कोणता हे सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे, नाहीतर याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात.
advertisement
4/8
हा पदार्थ आहे बीट (Beetroot).
advertisement
5/8
बिट हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो, त्यामुळे तो सॅलेडमध्ये खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात, एवढच नाही तर अनेक लोक याला सॅन्डविचमध्ये खातात, तर काही त्याची भाजी बनवून देखील खातात. ज्यामुळे त्याचे शरीराला फायदेच फायदे आहेत.
advertisement
6/8
पण हे लक्षात ठेवा की एकदा शिजवलेला बीट पुन्हा गरम केल्यास तो आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. विशेषतः यामुळे पाचनसंस्था आणि शरीरातील नायट्रेटचे प्रमाण असंतुलित होण्याचा धोका वाढतो.
advertisement
7/8
मग गरम केल्यावर काय होतं?बीट गरम केल्यावर त्यामधील नायट्रेट्स नायट्राईट्समध्ये (Nitrites) रूपांतरित होतात. जर हा प्रक्रियेस पुन्हा एकदा गरम करण्यासाठी वापरलं गेलं, तर हे नायट्राईट्स पुढे नायट्रोसॅमाइन्स (Nitrosamines) तयार करतात. हे रसायन अनेक अभ्यासांमध्ये कॅन्सरजन्‍य आणि हानिकारक असल्याचे आढळले आहे.
advertisement
8/8
शिवाय, ही रासायनिक प्रक्रिया शरीरात जाऊन ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या रक्तपेशींवर परिणाम करू शकते, ज्यामुळे काही लोकांना मळमळ, थकवा, डोकेदुखी, उलट्या यांसारख्या लक्षणांचा त्रास होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : शिळं जेवण गरम करुन खाणाऱ्यांना तज्ज्ञांचा इशारा, काहीही झालं तरी 'हा' पदार्थ दुसऱ्यांदा गरम करण्याची चूक स्वप्नात सुद्धा करु नका