TRENDING:

दही साखर घालून खावं की मीठ? आयुर्वेद काहीतरी वेगळंच सांगतं...

Last Updated:
ऋतू कोणताही असो, दही आपण वर्षांच्या 12 महिन्यांतून कधीही खातो. उन्हाळ्यात तर दही आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं कारण त्यामुळे पोटात गारवा निर्माण होतो. अन्नपचनही व्यवस्थित होतं. (अनंत कुमार, प्रतिनिधी)
advertisement
1/5
दही साखर घालून खावं की मीठ? आयुर्वेद काहीतरी वेगळंच सांगतं...
काहीजण घरी दही लावतात, तर काहीजण विकत आणतात. परंतु सर्वांनाच दह्याची चव आवडत नाही. काहीजणांना नुसतं दही खाण्यापेक्षा त्यात साखर किंवा मीठ मिसळून खायला आवडतं. परंतु आरोग्यासाठी नेमकं कोणतं दही उत्तम असतं, साखरेचं की मीठाचं? जाणून घेऊया.
advertisement
2/5
दह्यात साखर मिसळून खाल्ल्यास वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक आहे. त्यामुळे साखरेपेक्षा दह्यात मीठ मिसळून खाल्ल्यास उत्तम. मीठामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. परंतु उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर मीठ खाऊ नये. नाहीतर बीपी आणखी वाढण्याची शक्यता असते. शिवाय स्ट्रोक आणि हायपरटेंशन असा त्रासही होऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
3/5
उन्हाळ्यात लोक अनेकदा लस्सी पितात. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळतो. शरीर ऊर्जावान राहतं. परंतु लस्सीमुळेही वजन वाढण्याची शक्यता असते. आता आपण दह्यात साखर मिसळावी की मीठ मिसळावं याबाबत आयुर्वेद काय सांगतं जाणून घेऊया. आयुर्वेदिक डॉक्टर सुकृती यांनी याबाबत माहिती दिली आहे. 
advertisement
4/5
आयुर्वेद सांगतं की, प्रयत्न करा <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/why-do-we-eat-curd-sugar-before-any-shubha-karya-l18w-mhij-1175850.html">दही</a> जसं आहे तसंच खाण्याचा. त्यात काहीच मिसळू नका. जर तुम्हाला तसं <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/here-people-are-fans-of-dahi-jilebi-l18w-mhij-1061353.html">दही</a> अजिबात आवडत नसेल तर नाश्त्याच्या वेळी त्यात साखर मिसळून खाऊ शकता. परंतु दुपारी किंवा रात्री मात्र मीठच मिसळून खा. रात्री तर अजिबात दही खाऊ नये. शिवाय दररोज <a href="https://news18marathi.com/lifestyle/tips-to-make-curd-at-home-make-perfect-thick-and-tasty-curd-at-home-by-these-3-tips-mhpj-1177681.html">दही</a> खाऊ नये. तसंच कधीतरी दह्यात मूग डाळ, मध, तूप किंवा आवळा मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
दही साखर घालून खावं की मीठ? आयुर्वेद काहीतरी वेगळंच सांगतं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल