TRENDING:

मुलांच्या टिफिनबॉक्समध्ये देण्यासाठी घरीच बनवा बटाट्याचे पॉपकॉर्न; सोपी रेसिपी पाहा PHOTOS

Last Updated:
बटाट्याचे पॉपकॉर्न कधी बघितलेत का? तर विशेषतः लहान मुलांना खूप आवडणारी ही रेसिपी आहे.
advertisement
1/6
मुलांच्या टिफिनबॉक्समध्ये देण्यासाठी घरीच बनवा बटाट्याचे पॉपकॉर्न; रेसिपी पाहा
बटाट्याचे पदार्थ अनेकांना आवडीने खायला आवडतात. मात्र, बटाट्याचे पॉपकॉर्न कधी बघितलेत का? तर विशेषतः लहान मुलांना खूप आवडणारी ही रेसिपी आहे. शाळेत दररोज मुलांच्या टिफिनबॉक्समध्ये काय द्यावं? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारी बटाट्याचे पॉपकॉर्न रेसिपी <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्ध्यातील</a> गृहिणी शितल लुंगे यांनी सांगितली आहे.
advertisement
2/6
बटाट्याचे पॉपकॉर्न बनवण्यासाठी साहित्य : 4-5 कच्चे बटाटे, 1 वाटी कॉर्नफ्लोअर, मिरेपूड, रेडचिली फ्लेक्स, मीठ, कोथिंबीर हे साहित्य लागेल.
advertisement
3/6
सर्वप्रथम कच्चे बटाट्याचे साल काढून घेऊन खिसून घ्यावे. त्यानंतर खिस 4 वेळा स्वच्छ पाणी येतपर्यंत धुवून घ्यावे आणि खिस पिळून एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. त्यानंतर त्या किसलेल्या बटाट्याला मीठ लावून 5 मिनिटं ठेवावे.
advertisement
4/6
आता 5 मिनिटं झाल्यानंतर बटाट्याला पाणी सुटेल ते पाणीही पिळून घेऊन त्यावर गोळा तयार होईल इतकंच कॉर्नफ्लोअर पावडर घेऊन रेड चिलीफ्लेक्स ,मिरेपूड, आणि कोथिंबीर अ‍ॅड करून घ्यावी.
advertisement
5/6
आधी मीठ टाकलेलं असल्यामुळे आता परत मीठ टाकण्याची गरज नाही. साहित्य छान एकत्र झाल्यानंतर त्याचे छोटे गोळे करून घ्यावे. हे गोळे गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे. आता तुम्हाला आवडेल त्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर हे पॉपकॉर्न लहान मुलांना खायला देऊ शकता, असं शितल लुंगे सांगतात.
advertisement
6/6
तर अशाप्रकारे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत झटपट तयार होणारी त्यासोबतच मुलांना खूप आवडणारी ही रेसिपी तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करून बघा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मुलांच्या टिफिनबॉक्समध्ये देण्यासाठी घरीच बनवा बटाट्याचे पॉपकॉर्न; सोपी रेसिपी पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल