Kitchen Tips : कांदेपोहे खारट झाले तर काय करायचं? कांदेपोह्यातील जादा मीठ काढण्याची सोपी ट्रिक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Tips In Marathi : कांदेपोह्यात मीठ जास्त झालं तर ते कमी करण्यासाठी अशी सोपी ट्रिक की कुणाला खाताना कळणारही नाही की कांदेपोहे खारट झाले होते.
advertisement
1/7

कांदेपोहे हा बहुतेक घरांमध्ये बनणारा नाश्ता. पण कांदेपोहे बनवताना तुमच्यासोबत असं कधी झालं असेल किंवा कधी होईल, की अचानक कांदेपोह्यांमध्ये मीठ जास्त पडलं. तेव्हा आता काय करायचं? असा प्रश्न पडतो.
advertisement
2/7
आमटी किंवा भाजीत मीठ जास्त झालं की त्यामध्ये बटाटा किंवा गव्हाच्या पिठाचे गोळे टाकून त्यातील खारटपणा कमी करता येतो. पण कांदेपोह्यांचं तसं नाही मग काय करायचं?
advertisement
3/7
सरिता किचन या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होम कुक सरिताने दिलेल्या माहितीनुसार कांदेपोह्यांमध्ये मीठ जास्त झालं तर आणखी थोडे दुसरे कांदेपोहे घ्यायचे. ते थोडे भिजवून तेलात टाकून झाकण ठेवून त्याला एक वाफ काढायची, यात तुम्हाला हवी तर तुम्ही हळद टाका आणि आता हे पोहे कांदेपोह्यांमध्ये मिक्स करा.
advertisement
4/7
आता म्हणून काय तसेच खारट कांदेपोहे खायचे? की इतके कांदेपोहे फेकून द्यायचे... तर बिलकुल नाही. दोघांपैकी काहीच करायचं नाही. कांदेपोह्यातील मीठ कमी कसं करायचं याची ट्रिक आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
advertisement
5/7
नंतर वाफवलेल्या कांदेपोह्यांमध्ये आपण मीठ टाकलेलं नाही, त्यामुळे आधीच्या कांदेपोह्यांमधील ती जादा मीठ आहे ते या पोह्यांना लागतं आणि मिठाचं प्रमाण योग्य होतं.
advertisement
6/7
कांदेपोहेच नाही तर उपम्यासाठीही तुम्ही हीच ट्रिक वापरू शकता. थोडा रवा घेऊन तो भाजून वाफवून उपम्यामध्ये मिक्स करा. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पाहा.
advertisement
7/7
तुम्ही कांदेपोहे किंवा उपम्यात मीठ जास्त झालं तर काय करता? तेसुद्धा आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Kitchen Tips : कांदेपोहे खारट झाले तर काय करायचं? कांदेपोह्यातील जादा मीठ काढण्याची सोपी ट्रिक