TRENDING:

ब्रॉयलर की गावरान, कोणत्या कोंबडीची अंडी जास्त पौष्टिक, कशातून मिळते भरपूर ताकद?

Last Updated:
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, हे आपण ऐकलं असेलच. अंडी आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतात, त्यामुळे ती दररोज खाल्ल्यानं भरभरून पोषक तत्त्व मिळतात. अनेकजणांच्या दिवसाची सुरुवातच अंडी खाऊन होते, परंतु तुम्हाला माहितीये का, नेमकी कोणती अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असतात?
advertisement
1/5
ब्रॉयलर की गावरान, कोणत्या कोंबडीची अंडी जास्त पौष्टिक, कशातून मिळते भरपूर ताकद?
आज आपण जाणून घेणार आहोत की, ब्रॉयलर कोंबडीची अंडी जास्त पौष्टिक असतात की गावरान कोंबडीची. नेमकी कोणती अंडी खावी, पाहूया.
advertisement
2/5
तज्ज्ञ सांगतात की, पांढरं अंड ब्रॉयलर कोंबडीपासून मिळतं. या कोंबड्यांना बऱ्याचदा हॉर्मोन्सची आणि विविध केमिकल्स असलेली औषधं दिली जातात. त्यातून अंड्यांचा आकारदेखील जास्त मोठा केला जातो. या वजनाचं आपल्याला आकर्षण असतं. परंतु...
advertisement
3/5
या मोठ्या अंड्यातून केमिकल्सही आपल्या शरीरात जाऊ शकतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे अंड खाल्ल्यानंतर पोट गच्च होणं, ढेकर येणं हा त्रास होतो. बराच वेळ भूक न लागणे किंबहुना अंड्याचं पचनच न होणे, कधी कधी जुलाब होण्याचा त्रासही होऊ शकतो. तज्ज्ञ सांगतात की, गावरान अंड्यांमध्ये ब्रॉयलर अंड्यांपेक्षा पोषक तत्त्व 20 टक्क्यांनी जास्त असतात.
advertisement
4/5
अंड हे हृदयविकार, मधुमेह, अशक्तपणा, पचनाच्या व्याधी आणि गॅसच्या त्रासावर गुणकारी असतं. दररोज 1 अंड खाणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. अंड्यांमध्ये प्रोटिन्स, महत्त्वाची खनिजं असतात, जी शरीराला दीर्घकाळ ऊर्जावान ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
advertisement
5/5
अंड्यातील जीवनसत्त्व अ डोळ्यांसाठी, त्वचेसाठी महत्त्वाचं असतं. तसंच अंड मुलांच्या वाढीच्या दृष्टीनंही फायदेशीर मानलं जातं. जीवनसत्त्व बी1, बी5, बी12 हेदेखील अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वाढीच्या दृष्टीने सर्वांसाठीच अंड पौष्टिक असतं. परंतु गावरान अंड घेतलं तर त्याचा जास्त चांगला परिणाम शरीरावर होतो, असं म्हणतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
ब्रॉयलर की गावरान, कोणत्या कोंबडीची अंडी जास्त पौष्टिक, कशातून मिळते भरपूर ताकद?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल