ऐकावे ते नवलंच! पुण्यात मिळतीय चक्क पिझ्झा मिसळ, किंमत 150 रुपये
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील टिळक रोड इथे पिझ्झा मिसळ मिळते. हे ऐकून तुम्हाला ही नवलंच वाटेल पण या पदार्थाची चव काही वेगळीच असून ती खाण्यासाठी लोकांची गर्दी ही असते.
advertisement
1/7

पुण्याच्या खाद्य पदार्थाची चव काही वेगळीच असून अनेकांना ती आपल्या प्रेमात पाडते. अनेकांचा आवडता पदार्थ म्हणजे मिसळ आणि मिसळमध्ये अनेक प्रकार ही आपल्याला पाहायला मिळतात.
advertisement
2/7
असंच पुण्यातील टिळक रोड इथे पिझ्झा मिसळ मिळते. हे ऐकून तुम्हाला ही नवलंच वाटेल पण या पदार्थाची चव काही वेगळीच असून ती खाण्यासाठी लोकांची गर्दी ही असते.
advertisement
3/7
पुण्यातील टिळक रोडवरील बाप्पाची मिसळ या नावाने उपहारगृह आहे. विवेक कुलकर्णी यांच्या या बाप्पाची मिसळची चव फेमस होत आहे. गेली चार वर्ष झालं ते हा व्यवसाय करत आहेत. तर इथे अनेक प्रकारच्या मिसळ या मिळतात.
advertisement
4/7
साऊथ आफ्रिकन असलेला बनी चाव हा पदार्थ आपण महाराष्ट्रात आणला आहे. बनी चाव मिसळ म्हणून बनवला जातो. त्याचप्रमाणे मिसळ पिझ्झा आहे.
advertisement
5/7
मिसळ पिझ्झाकडे प्रामुख्याने लहान मुलं किंवा महिला वर्ग जास्त आकर्षित होतो. पिझ्झा बेसवर मिसळची स्टफिंग करून चिझी स्पायसी तयार केला जातो.
advertisement
6/7
यामध्ये मैद्याचा वापर हा केला जात नाही. त्यामुळे आरोग्यासाठी चांगली आहे. नॉर्मल मिसळ ही स्पायसी असते परंतु याची चव थोडी वेगळी असून अगदी लहान मुलं ही खाऊ शकतात. बेसिक मिसळ ही 80 रुपयांपासून सुरू होते. बनी चाव ही 160 तर मिसळ पिझ्झा 150 रुपये किंमत आहे, अशी माहिती व्यवस्थापक धनंजय इंगवले यांनी दिली आहे.
advertisement
7/7
हा मिसळचा एक वेगळा प्रकार असून त्याला लोकांची चांगली पसंती देखील मिळत आहे. आणि तशी त्याची किंमत असून त्याची चव ही वेगळी आहे म्हणजे खाताना एकाच वेळेस दोन पदार्थ खाल्ल्याचा फील हा तुम्हाला येतो. त्यामुळे तुम्ही ही या ठिकाणाला नक्कीच जाऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
ऐकावे ते नवलंच! पुण्यात मिळतीय चक्क पिझ्झा मिसळ, किंमत 150 रुपये