TRENDING:

Habits For Long life : 'या' सवयी तुम्हाला बनवतील दीर्घायुषी! कायम राहाल निरोगी आणि आनंदी...

Last Updated:
प्रत्येकाला दीर्घायुष्य हवे असते, परंतु केवळ इच्छा असून काहीही होत नाही. यासाठी तुमची जीवनशैली, तुमच्या सवयी हे सर्व आरोग्यदायी असायला हवे. लोक सहसा छोट्या छोट्या गोष्टींवर रागराग करतात, तणावात राहतात. दुःख, तणाव, चिंता या सर्वांमुळे तुमचे वय कमी होऊ शकते. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी राहायचे असेल तर तुमच्या जीवनशैलीत या आरोग्यदायी सवयींचा अवश्य समावेश करा.
advertisement
1/7
'या' सवयी तुम्हाला बनवतील दीर्घायुषी! कायम राहाल निरोगी आणि आनंदी...
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहाणे : हल्ली बऱ्याच लोकांचे काम बसून असते. मात्र खूप काळासाठी एकसारखे बसून राहणे आणि त्यानंतर जेवण करून सरळ झोपणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे म्हणजे तुम्ही दिवसातून काहीवेळा चालणे आणि व्यायाम करू शकता.
advertisement
2/7
औषधीचे व्यसन लागू देऊ नका : कोणत्याही छोट्या छोट्या दुखण्यावर गोळ्या घेण्याची काही लोकांना सवय असते. मात्र ही सवय घातक असते. यामुळे तुम्हाला औषधींचे व्यसन लागू शकते. त्यामुळे तुम्ही हे टाळणेच योग्य.
advertisement
3/7
धुम्रपान-मद्यपान सोडा : सर्वानाच माहित आहे की, धूम्रपान आणि मद्यपान आपल्या आरोग्यासाठी घातक असते. मात्र काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. परंतु तुम्हाला कायम निरोगी राहायचे असेल. तर तुम्ही हे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.
advertisement
4/7
तणावाचे व्यवस्थापन करा : आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तणावाचा सामना करावा लागतो. तणाव आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत बनवत जातो. त्यामुळे तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा, ध्यान करा यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.
advertisement
5/7
चांगला आहार घेणे : वाईट सवयी सोडण्याबरोबरच चांगला आहार घेणेदेखील आपल्यासाठी आवश्यक असते. चांगल्या आहारामुळे आपण कायम निरोगी राहू शकतो आणि आपले मानसिक आरोग्यही चांगले राहते.
advertisement
6/7
चांगली झोप घेणे : आपल्या शरीराला जितकी आहाराची आणि पाण्याची गरज असते. तितकीच झोपेचीही गरज असते. आपल्याला उत्तम झोप मिळाल्यास आपले आरोग्यही उत्तम राहते आणि सर्व कामे करण्यासाठी आपल्याला एनर्जीही मिळते.
advertisement
7/7
सकारात्मक सामाजिक संबंध जपणे : शारीरिक आरोग्यासाठी जसे अन्न, झोप आणि व्यायाम आवश्यक असतात तसेच मानसिक आरोग्यासाठी आपल्याला शांतता आणि चांगल्या व्यक्तींचा सहवास आवश्यक असतो. यासाठी सकारात्मक असलेल्या व्यक्तींसोबत वेळ घालवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Habits For Long life : 'या' सवयी तुम्हाला बनवतील दीर्घायुषी! कायम राहाल निरोगी आणि आनंदी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल