TRENDING:

कोलेस्ट्रॉल जिऱ्यामुळे होतं कमी, वजनही राहतं नियंत्रणात! महागडे उपाय कशाला?

Last Updated:
स्वयंपाकघरातले सर्व मसाले औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आणि आरोग्यासाठी उपयुक्त असतात. जिऱ्यामुळे तर कोलेस्ट्रॉल, मधुमेह नियंत्रणात राहतं. फक्त त्याचा वापर व्यवस्थित व्हायला हवा. असं केवळ आम्ही नाही, आयुर्वेदिक डॉक्टर पंकज पानुली सांगतात. 
advertisement
1/5
कोलेस्ट्रॉल जिऱ्यामुळे होतं कमी, वजनही राहतं नियंत्रणात! महागडे उपाय कशाला?
जिरं सामान्यत: पावडर किंवा बियांच्या रूपात वापरलं जातं. फोडणीत केवळ सुगंध येण्यासाठी जिऱ्याचा उपयोग होतो असं आपल्याला वाटतं, परंतु जिऱ्याचे फायदे यापलिकडचे आहेत. सकाळी जिऱ्याचं <a href="https://news18marathi.com/lifestyle/healthy-drink-for-summer-drink-this-water-every-morning-to-get-relief-from-stomach-fire-problem-mhpj-1163221.html">पाणी</a> प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय पोटासंबंधित विविध विकारांवर <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food-for-good-sleep-eat-these-5-foods-at-night-to-get-good-and-peaceful-sleep-mhpj-1166383.html">आराम</a> मिळतो.
advertisement
2/5
डॉ. पंकज पानुली यांनी सांगितलं की, जिरा हा भारतीय जेवणातला एक महत्त्वाचा पदार्थ आहे. त्याला आयुर्वेदातही प्रचंड महत्त्व आहे. जिऱ्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास जिरं फायदेशीर ठरतं. शिवाय मधुमेहाचा त्रास कमी होण्यासही मदत मिळते. 
advertisement
3/5
जिऱ्याच्या पाण्यामुळे शरिरातील चरबी कमी होते. भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे आपोआप वजन कमी होतं. शिवाय अशक्तपणा, मासिक पाळीदरम्यानच्या समस्या, त्वचेसंबंधित, केसांसंबंधित समस्याही जिऱ्यामुळे दूर होतात. तसंच हृदयाचं आरोग्य सुदृढ राहतं.
advertisement
4/5
जिऱ्याचं <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/know-everyday-how-much-water-you-should-drink-in-summer-season-l18w-mhkd-1163627.html">पाणी</a> कसं बनवायचं पाहूया. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चमचाभर जिरं रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी गाळून हे पाणी प्या. रिकाम्यापोटी हे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लक्षात घ्या, गरोदर <a href="https://news18marathi.com/lifestyle/women-health-ladies-should-follow-these-5-habits-to-stay-fit-healthy-balance-hormones-mhpj-1165046.html">महिला</a> आणि मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांनी हे पाणी पिणं धोक्याचं ठरू शकतं.
advertisement
5/5
सूचना : वर दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. आपण यापैकी कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
कोलेस्ट्रॉल जिऱ्यामुळे होतं कमी, वजनही राहतं नियंत्रणात! महागडे उपाय कशाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल