TRENDING:

Health Tips: पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणं तुमच्यासाठी धोकादायक, पायांना होतो हा गंभीर आजार!

Last Updated:
पाय जर सतत पाण्यात राहत असेल तर पायाला खाज सुटणे, बारीक पुरळ येणे, पायातून दुर्गंधी येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या उद्भवू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. 
advertisement
1/7
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणं तुमच्यासाठी धोकादायक, पायांना होतो हा गंभीर
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झालेला दिसतो. तसेच पाणीसुद्धा साचलेले असते. त्यातून ये-जा केल्यानंतर पायाला चिखल लागतो. त्यामुळे पायाला खाज सुटणे, बारीक पुरळ येणे, पायातून दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या वाढीस लागतात. त्यावर लक्ष न दिल्यास अतिशय वेदना होतात.
advertisement
2/7
पायाची बोटे खराब होतात. तसेच पाय जर सतत पाण्यात राहत असेल, तेव्हाही या समस्या उद्भवू शकतात. या समस्या उद्भवू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. त्याबाबत माहिती जाणून घेऊ.
advertisement
3/7
पावसाळ्यात चिखलामुळे होणाऱ्या समस्या त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसात किंवा चिखलात भिजलेले पाय जर वेळेवर स्वच्छ नाही केले गेले, तर त्यातून त्वचेचे विविध विकार होऊ शकतात. पावसाळ्यात जर पाय सतत ओलसर राहत असेल, तर या ओलसरपणामुळे त्वचेला हवा मिळत नाही आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होते.
advertisement
4/7
अनेकांना खाज, लालसरपणा, त्वचा उकरून निघणे किंवा चट्टे पडणे यांसारख्या तक्रारी दिसून येतात. पायाची काळजी घेण्यासाठी उपाय पावसामुळे पाय ओले तर होणारच. पण, त्यानंतर काळजी घेतल्यास समस्यांना तुम्ही आळा घालू शकता.
advertisement
5/7
1. पायाची निगा राखणे पावसात भिजल्यानंतर पाय त्वरित साबणाने धुवून कोरडे करावेत. ओलसर बूट किंवा मोजे पुन्हा वापरू नयेत. शक्य असल्यास चप्पल किंवा सँडल्स वापरून पाय हवेशीर ठेवावेत. 2. फंगल इन्फेक्शनपासून संरक्षण दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ करून अँटी-फंगल पावडर वापरावी. जर खाज, रॅशेस, किंवा खवखव जाणवत असेल, तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
6/7
3. योग्य प्रकारच्या चप्पल वापरणे पावसाळ्यात पाणी साचलेल्या भागातून दररोज जावे लागत असल्यास गमबूट वापरणे सुरक्षित ठरू शकते. चिखलामधून चालताना बंद बूट टाळावेत, कारण त्यात ओलसरपणा अधिक काळ टिकून राहतो. 4. इम्युनिटी मजबूत ठेवणे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या लक्षणांसाठी वेळीच उपचार घेणे. संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
advertisement
7/7
त्यामुळे कोणतेही आजार जास्त काळ राहत नाहीत. पावसाळ्यात चिखल आणि ओलसरपणा टाळणे कठीण असले तरी योग्य काळजी घेतल्यास त्वचेसंबंधी त्रास टाळता येतो. पाय स्वच्छ ठेवणे, हवेशीर चप्पल वापरणे, अँटी-फंगल उपाय करणे आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. पायातील किरकोळ त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाणं तुमच्यासाठी धोकादायक, पायांना होतो हा गंभीर आजार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल