TRENDING:

वाढत्या वयात वाताचा धोका, लगेच करा हे काम, डॉक्टरांनी दिला सल्ला

Last Updated:
वाढत्या वयात अनेकांना वात ही समस्या उद्भवते. त्यावर योग्य उपचार केल्यास त्यापासून बचाव करता येतो. वातरोगाचे 11 प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे (SLE) सिस्टेमिक लुपस इरिथेमॅटोसस.
advertisement
1/7
वाढत्या वयात वाताचा धोका, लगेच करा हे काम, डॉक्टरांनी दिला सल्ला
रसायनाच्या वापरामुळे आणि चुकीच्या खानपानामुळे सध्या मानवी शरीर हे कमजोर होत चालले आहे. नवनवीन प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या वयात अनेकांना वात ही समस्या उद्भवते. त्यावर योग्य उपचार केल्यास त्यापासून बचाव करता येतो.
advertisement
2/7
वातरोगाचे 11 प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे (SLE) सिस्टेमिक लुपस इरिथेमॅटोसस. हा वातरोग नेमका कशाने होतो? यावर उपाय काय? याबाबत माहिती डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
advertisement
3/7
सिस्टेमिक लुपस इरिथेमॅटोसस याबाबत माहिती देताना डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, या आजारामध्ये आपल्या शरीरामध्ये जे रोग प्रतिकारक शक्ती आहे, ती शहरातील निरोगी पेशींवर हल्ला करायला सुरुवात करते. त्यामुळे आपल्या शरीराचे अनेक अवयवांना त्रास होण्यास सुरुवात होते.
advertisement
4/7
जॉइंट दुखणे, किडनीवर परिणाम, ब्रेनवर परिणाम, लाल रक्त पेशी, हृदय, फुफ्फुस या सर्व अवयवांवर परिणाम होऊन प्रकृती बिघडण्यास सुरुवात होते. हा आजार झालाय? कसं ओळखायचं? यासाठी त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे,
advertisement
5/7
सिस्टेमिक लुपस इरिथेमॅटोसस आजाराची लक्षणे : 1. तीव्र थकवा जाणवणे. 2. जॉइंटचे दुखणे वाढायला लागते. 3. अंगावर लाल रंगाचे चट्टे पडतात. 4. उन्हात गेल्यानंतर त्रास वाढतो. 5. सतत ताप राहणे. 6. मनस्थिती बरोबर राहत नाही, म्हणजेच संभ्रम निर्माण होतो. 7. केस गळती सुरू होणे.
advertisement
6/7
ही सर्व लक्षणे सिस्टेमिक लुपस इरिथेमॅटोसस या आजारामध्ये दिसून येते. अशी लक्षणे आढळून आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी काही वेगळ्या आणि विशेष रक्त तपासणी असतात. त्यामुळे या आजाराचे निदान लावता येते. त्यानंतर योग्य उपचार करता येऊ शकतो. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, उपचार सुरू केल्यास तुम्ही तुमचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकता.
advertisement
7/7
त्याचबरोबर काही काळजी स्वतः सुद्धा घेणे आवश्यक आहे. जसे की, आहार संतुलित घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी व्यवस्थित आणि कंफर्टेबल कपडे घालणे. सकाळी उठून काही वेळ व्यायाम करणे. यासर्व गोष्टी केल्यास सिस्टेमिक लुपस इरिथेमॅटोसस हा आजार नियंत्रित राहण्यास मदत होते, असे डॉ. टाकरखेडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
वाढत्या वयात वाताचा धोका, लगेच करा हे काम, डॉक्टरांनी दिला सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल