TRENDING:

Health Tips: तुमचेही गळताय केस? हे उपाय आजचं करा, कायमची केस गळती होईल दूर

Last Updated:
अगदी कमी वयातच केस गळती होऊन केस पातळ होतात. त्यामुळे केस गळतीची कारण शोधून त्यावर उपाय उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
1/7
तुमचेही गळताय केस? हे उपाय आजचं करा, कायमची केस गळती होईल दूर
सद्यस्थितीमध्ये केस गळतीचे प्रमाण खूप वाढलेले दिसून येत आहे. महिला आणि पुरुष दोघांमध्येही केस गळतीचे प्रमाण आहे. अगदी कमी वयातच केस गळती होऊन केस पातळ होतात. त्यामुळे केस गळतीची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. केस गळतीची कारणे नेमकी कोणती? याबाबत माहिती डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
advertisement
2/7
सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केस गळतीची कारणे महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी असू शकतात. पुरुषांमधील केस गळतीची कारणे कोणती? ते आपण जाणून घेऊ.
advertisement
3/7
पुरुषांमध्ये सर्वाधिक केसगळती ही आनुवंशिकतेमुळे होत असल्याचं निष्पन्न झालं आहे. आपल्या घरातील वडील, काका, मामा, आजोबा यांचे टक्कल पडले असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा ही समस्या होऊ शकते. त्याचबरोबर अनेकांना फॅमिली हिस्ट्री नसताना सुद्धा जेनेटिक म्युटेशनमुळे केस गळतीची समस्या निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
advertisement
4/7
महिलांमधील केसगळतीची कारणे कोणती? तसेच महिलांमध्ये पचनाच्या समस्या, हार्मोनल असंतुलन, तणाव या कारणामुळे केस गळतीची समस्या आढळून येते. तसेच केसांत इन्फेक्शन असल्यास महिला आणि पुरुष दोघांमध्येही केस गळती बघायला मिळते. तसेच केसांसाठी हेअर कलर किंवा आणखी काही प्रॉडक्ट वापरत असाल आणि त्यांची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तेव्हा सुद्धा केस गळती होऊ शकते.
advertisement
5/7
याबाबत माहिती देताना डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, केसांच्या समस्या रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहार घेणे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचा समावेश करून घेणे.
advertisement
6/7
केसांच्या आरोग्यासाठी पोषक असलेल्या सर्वच पदार्थांचा आहारात समावेश करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादा शाम्पू केस धुण्यासाठी वापरावा.
advertisement
7/7
तसेच केसांना तेल लावणे टाळावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे देखील टाळावे. केमिकल युक्त हेअर कलर आणि इतरही प्रॉडक्ट वापरणे टाळल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते. आनुवंशिक कारणामुळे होणारी केस गळती ही होणारच. पण योग्य काळजी घेतल्यास त्याचे प्रमाण देखील कमी होण्याची शक्यता असते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: तुमचेही गळताय केस? हे उपाय आजचं करा, कायमची केस गळती होईल दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल