Healthy Living : कोणत्या वयानंतर पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते? बाबा होण्यासाठी कोणतं वय योग्य?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Healthy Living :लक्षात ठेवा की वय हे पुरुषांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे जेवढे स्त्रियांसाठी बाळंतपणाचे असते.
advertisement
1/10

तणाव, धूम्रपान, मद्यपान, अस्वस्थ आहार आणि निद्रानाश ही पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होण्याची काही कारणे आहेत. लक्षात ठेवा की वय हे पुरुषांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे जेवढे स्त्रियांसाठी बाळंतपणाचे असते.
advertisement
2/10
पुरुष कोणत्याही वयात पिता बनू शकतात आणि त्यांचे वय ही मुले होण्यासाठी कधीही अडथळा आणत नाही, ही पूर्णपणे चुकीची कल्पना आहे. स्त्री प्रमाणे पुरुषांचं वय ही बाळ होण्यासाठी महत्वाचं आहे.
advertisement
3/10
जेव्हा मुले जन्माला येतात तेव्हा स्त्री आणि पुरुष दोघांसाठी वय खूप महत्वाचं असतं.
advertisement
4/10
हल्ली तरुण-तरुणी खूप उशीरा लग्न करतात आणि त्यानंतर अनेक वर्षांनी ते बेबी प्लानिंग करतात. अशावेळी प्रश्न उभा रहातो की बाबा किंवा आई होण्याचं योग्य वय कोणतं? आणि कोणत्या वयानंतर पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते?
advertisement
5/10
मॅटुरिटास जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात असे म्हटले आहे की, वयोमानानुसार पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होते.
advertisement
6/10
स्त्रियांमध्ये, रजोनिवृत्तीनंतर मुले होण्याची शक्यता नसते. पण मुलांच्या शरीरात शुक्राणू निर्माण होण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. पण वयानुसार पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये जनुकीय उत्परिवर्तन होत असते. परिणामी, शुक्राणूंच्या डीएनएचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत पुरुषांचे वडील बनण्याची शक्यताही अनेक वेळा कमी होते.
advertisement
7/10
अभ्यासातून असे दिसून आले आहे की 45 वर्षांच्या वयानंतर पुरुषांची मुले होण्याची क्षमता कमी होते आणि जर ते वडील झाले तर त्यांच्या नवजात मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर त्यांच्या जोडीदारांना गर्भधारणेचा मधुमेह, प्रीक्लॅम्पसिया यासारख्या समस्यांनाही त्रास होऊ शकतो.
advertisement
8/10
अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर वडीलांचं वय जास्त असेल तर मुलाला न्यूरोलॉजिकल रोगांचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त, जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असू शकते.
advertisement
9/10
अभ्यासात असेही आढळून आले आहे की जर वडीलांचं वय जास्त असेल तर नवजात बाळाला जन्मापासून हृदयविकाराचा त्रास देखील उद्भवू शकतो.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Living : कोणत्या वयानंतर पुरुषाच्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते? बाबा होण्यासाठी कोणतं वय योग्य?