TRENDING:

Heart Attack In Winter हिवाळ्यात का वाढतात हार्ट ॲटॅक? अशी घ्या हृदयाची विशेष काळजी

Last Updated:
हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. कारण थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. ज्यांना आधीच हृदयरोग किंवा हृदयाशी संबंधित आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी अधिकची थंडी ही धोकादायक ठरू शकते. ज्यांना आधीच हृदयविकार आहे त्यांना थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 31% वाढतो. त्यामुळे थंडीच्या काळात हृदयाला अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.
advertisement
1/7
Heart Attack Winter हिवाळ्यात का वाढतात हार्ट ॲटॅक? अशी घ्या हृदयाची विशेष काळजी
दरवर्षी हिवाळ्याच्या काळात हृदयविकाराच्या घटनांमध्ये 15% वाढ होते. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि हृदयाच्या स्नायूंना कमी ऑक्सिजन मिळतो आणि त्यांच्यावर ताण पडून हृदयविकाराचं प्रमाण वाढतं.
advertisement
2/7
ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित समस्या, ज्यांचा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, ज्यांचे वजन जास्त आहे. ज्यांना डायबिटीजची समस्या आहे अशांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
advertisement
3/7
वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते, जगभरात हृदयाशी संबंधित समस्यांमुळे दरवर्षी 2 कोटींहून अधिक लोकं मृत्यूमुखी पडतात. याचा अर्थ हृदयाशी संबंधित आजारांमुळे दर 1.5 सेकंदाला एक व्यक्तीचा मृत्यू होतोय.
advertisement
4/7
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, हृदयाशी संबंधित समस्या हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 2019 मध्ये सुमारे 1.79 कोटी लोकांचा मृत्यू हृदयविकाराने झाला होता. यापैकी 85% मृत्यू हार्ट अटॅक आणि स्ट्रोकमुळे झाले होते.
advertisement
5/7
अमेरिकेत वर्षभरात हृदयविकाराच्या झटक्याने जितके मृत्यू होतात तितके एकट्या 25 डिसेंबरला होतात. यानंतर 26 डिसेंबर आणि त्यानंतर 1 जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे.
advertisement
6/7
थंडीमुळे शरीराचं तापमान कमी झाले की शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
advertisement
7/7
ज्या व्यक्ती जास्त धुम्रपान, मद्यपान करतात अशा व्यक्तींना थंडीत हृदयविकाराचा त्रास वाढतो. त्यामुळे त्यांनी थंडीत आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Heart Attack In Winter हिवाळ्यात का वाढतात हार्ट ॲटॅक? अशी घ्या हृदयाची विशेष काळजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल