Health Tips : एका दिवसात किती वेळा लघवी करायला हवी?
- Published by:Priya Lad
Last Updated:
How may times pee in day : लघवी होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण एका दिवसात किती वेळा लघवी करायला हवी, किती वेळा लघवी होणं सामान्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/5

लघवी होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बहुतेक लोक सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्याआधी लघवीला जातात. दिवसातूनही मधे मधे लघवी होते. काही लोकांना सतत लघवी होत असते तर काहींना दिवसातून विशिष्ट वेळीच. पण एका दिवसात किती वेळा लघवी करायला हवी, किती वेळा लघवी होणं सामान्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
2/5
एक निरोगी व्यक्ती दिवसातून 4 ते 7 वेळा लघवी करते. 24 तासांत सुमारे 6-8 वेळा लघवी होणंदेखील सामान्य मानलं जातं. तसंच जे लोक दिवसातून 3 ते 5 लीटर पाणी पितात ते यापेक्षा जास्त लघवी करू शकतात.
advertisement
3/5
पण जर तुम्हाला दिवसातून वारंवार, दिवसातून 8-10 वेळा लघवी करावी लागत असेल तर ते सामान्य नाही. हे आरोग्याच्या समस्येचं लक्षण असू शकतं.
advertisement
4/5
मूत्रमार्गाचा संसर्ग , डायबेटिज, प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे, मूत्राशयातील खडे किंवा संसर्ग आणि गर्भधारणा ही वारंवार लघवी होण्याच कारणं असू शकतात.
advertisement
5/5
जर तुम्ही दिवसातून 8-10 पेक्षा जास्त वेळा लघवी करत असाल. रात्री लघवी करण्यासाठी वारंवार उठावx लागत असेल. लघवी करताना वेदना, जळजळ होत असेलm लघवीचा रंग-वास बदलला असेल. जर तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.