Chapati : कॅसरोलमध्ये ठेवताच चपात्या ओल्या होतात, फॉलो करा ही सोपी ट्रिक, अनेक तासानंतरही चपाती राहील फ्रेश
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
अनेक घरांमध्ये चपाती ठेवण्यासाठी कॅसरोलचा वापर केला जातो. कॅसरोलमध्ये चपात्या खूप वेळ गरम राहतात. मात्र काहीवेळा गरम चपात्या कॅसरोलमध्ये ठेवल्याने काही वेळाने त्याला पाणी सुटतं आणि त्या चिपचिपीत होतात. तेव्हा असे होऊ नये आणि कॅसरोलमध्ये ठेवलेल्या चपात्या सुद्धा ड्राय रहाव्यात यासाठी काही टिप्स फॉलो करा.
advertisement
1/5

चपाती ठेवण्यासाठी कॅसरोलचा वापर करत असाल तर कॅसरोलचं भांड हे तुमच्या चपातीच्या आकारापेक्षा मोठ असाव. जेणेकरून जर कॅसरोल मोठा असला तर झाकणावर साचलेलं पाणी थेट चपात्यांवर न पडता त्याच्या आसपास पडेल.
advertisement
2/5
कॅसरोलच्या आत चपात्यांच्या खाली तुम्ही जाळीदार प्लेट ठेऊ शकता. त्यामुळे जर स्टीम होऊन पाणी खाली पडले तरी त्याचा चपातीशी संपर्क होऊ शकते नाही. चपातीच्या वरती तुम्ही कॉटनचा रुमाल सुद्धा ठेऊ शकता.
advertisement
3/5
कॅसरोलमध्ये चपात्या ठेवत असताना खाली पेपर टॉवेल पसरवून ठेवा. यामुळे पेपर अतिरिक्त पाणी शोषून घेईल आणि चपात्या ओल्या होणार नाहीत.
advertisement
4/5
चपात्या कॅसरोलमध्ये ठेवत असताना त्या छोट्या कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे चपात्या पाण्याच्या संपर्कात येणार नाहीत आणि त्या सुक्या राहतील.
advertisement
5/5
कॅसरोलमध्ये चपात्या ठेवण्यापूर्वी त्यात एल्यूमिनियम फॉईल ठेवा. एल्यूमिनियम फॉईलवर तूप लावून घ्या आणि मग त्याच्यावर चपात्या ठेऊन फॉईल गुंडाळून घ्या. यामुळे चपात्या ओल्या होणार नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chapati : कॅसरोलमध्ये ठेवताच चपात्या ओल्या होतात, फॉलो करा ही सोपी ट्रिक, अनेक तासानंतरही चपाती राहील फ्रेश