TRENDING:

Ghee : एकदा साठवलेल्या सायीपासून दोन वेळा तूप बनवण्याची पद्धत, सोबत पनीरही बनेल

Last Updated:
Homemade Ghee Recipe : एकदा साय साठवली की साठवलेल्या सायीपेक्षाही कमी तूप निघतं ही समस्या कित्येकांची आहे. मग साठवलेल्या या सायीपासून दोन वेळा तूप कसं काय बनेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यासाठी एक खास ट्रिक आहे.
advertisement
1/5
एकदा साठवलेल्या सायीपासून दोन वेळा तूप बनवण्याची पद्धत, सोबत पनीरही बनेल
बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे तूप तुम्हाला पाहायला मिळतील. पण बहुतेक लोक देशी घी किंवा घरगुती तूपच पसंत करतात. दुधावर येणारी साय साठवून त्यापासून तूप तयार केलं जातं. आता ही एकदाच साठवलेली साय ज्याच्यापासून तुम्ही एकदा नाही तर दोन वेळा तूप बनवू शकता. इतकं काय तर याच सायीपासून तुम्ही पनीरही बनवू शकता. आता ते कसं काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
2/5
आता करायचं काय तर सगळ्यात आधी सामान्यपणे ज्या पद्धतीने तुम्ही तूप बनवता त्या पद्धतीने ते बनवून ध्या. हे तूप एका भांड्यात भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या.
advertisement
3/5
तूप तयार झाल्यावर शेवटी जो गाळ राहतो ज्याला बेरी म्हणतात ती बेरी फेकून देऊ नका. ती पुन्हा कढईत टाका आणि त्यात ग्लासभर पाणी टाकून उकळून घ्या. हे पाणी गाळून घ्या, त्यातील बेरी आता टाकून द्या. गाळलेलं पाणी फ्रिजरमध्ये ठेवा. तुम्ही पाहाल तर याचं तूप तयार झालेलं दिसेल.
advertisement
4/5
आता तुम्ही म्हणाल पनीरचं काय? तर सायीच लोणी बनवल्यानंतर तूप बनवण्याआधी त्यात जे दूध असतं ते गाळून घ्या. हे दूध गरम करा त्यात लिंबूसत्व किंवा लिंबूरस टाका, म्हणजे ते फाटेल. त्यातील पाणी गाळून फेकून द्या. पनीर तयार.
advertisement
5/5
@sujatapatilsrecipe1508 या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात एकदा साठवलेल्या सायीपासून दोन वेळा तूप आणि पनीर कसं बनवायचं हे दाखवलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ghee : एकदा साठवलेल्या सायीपासून दोन वेळा तूप बनवण्याची पद्धत, सोबत पनीरही बनेल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल