Milk Tea Recipe : दूध आधी घालायचं की पाणी उकळल्यावर? परफेक्ट दुधाचा चहा बनवण्याची पद्धत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Perfect Milk Tea Recipe : खरं तर चहाची चव आणि सुगंध दोन्ही तुम्ही तो कसा बनवता यावर अवलंबून असतात. जर पद्धत योग्य असेल तर तुमच्या चहाची चव इतकी उत्तम असेल की त्याचा सुगंध शेजाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकजण विचारेल की तुम्ही चहा कुठून बनवला.
advertisement
1/5

दुधाचा चहा केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही चांगला असतो. त्यात असलेले कॅफिन तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा देतं आणि थकवा दूर करतं. थंड हवामानात किंवा थंडीत, कडक दुधाचा चहा घशाच्या दुखण्यावरही आराम देतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आलं, वेलची आणि दालचिनी असलेला चहा देखील सर्वोत्तम मानला जातो.
advertisement
2/5
चहा बनवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य बेस तयार करणं. यासाठी प्रथम एका पॅनमध्ये थोडं पाणी उकळवा. तुम्ही पाण्यात काळी मिरी पावडर, हिरवी वेलची, दालचिनी, तमालपत्र आणि साखर असे काही मसाले घालू शकता. हे सर्व पाण्यात व्यवस्थित उकळल्याने चहाची चव खोलवर येते आणि चहाची चव दुप्पट होते. मसाले घालण्यापूर्वी हलके बारीक करा जेणेकरून त्यांची चव आणि सुगंध अधिक येईल.
advertisement
3/5
तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार साखर घाला, निरोगी पर्याय म्हणून तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील वापरून पाहू शकता. चहा जास्त वेळ उकळू नका, अन्यथा त्याची चव कडू होऊ शकते. आता दुधाचा चहा बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध कधी घालायचं? पाणी उकळल्यानंतर दूध घालावं की आधी घालावं? बरेच लोक गोंधळलेले असतात आणि बहुतेक लोकांना योग्य पद्धत माहीत नसते.
advertisement
4/5
तज्ज्ञ म्हणतात की जर तुम्ही थेट दूध घालून चहा उकळला तर मसाल्यांची खरी चव नीट बाहेर येणार नाही. त्यामुळे जेव्हा पाणी उकळेल, मसल्याची चव पाण्यात चांगली विरघळेल, तेव्हा त्यात दूध घाला आणि मंद आचेवर थोडा वेळ उकळा. यामुळे चहाचा रंग आणि चव दोन्ही उत्तम असेल.
advertisement
5/5
नेहमी ताजं दूध आणि स्वच्छ पाणी वापरा.चहा तयार झाल्यावर लगेच गॅस बंद करा आणि गाळण्यापूर्वी एक किंवा दोन मिनिटे झाकणाने झाकून ठेवा. असं केल्याने चहाची चव आणखी समृद्ध होते आणि वाढणारी वाफ संपूर्ण कपमध्ये चांगली शोषली जाते. हे छोटंसं पाऊल तुमचा चहा आणखी खास बनवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Milk Tea Recipe : दूध आधी घालायचं की पाणी उकळल्यावर? परफेक्ट दुधाचा चहा बनवण्याची पद्धत